आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्षे शिक्षा:​​​​​​​साथीदाराला 3 महिन्यांची कैद; पुनर्वसनासाठी पी‍डितेला 20 हजार देण्याचे आदेश

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीला मित्राच्या घरी डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी आणि या गुन्ह्यात मदत करणाऱ्या साथीदाराला तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के.आर. चौधरी यांनी ठोठावली. विशेष म्हणजे आरोपीला ठोठावलेल्या दंडापैकी २० हजार रुपये पुनर्वसनासाठी पी‍डितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अनिल ऊर्फ नंदू शेषराव शेलार (२३, रा. हुसेन कॉलनी) असे नराधमाचे नाव असून प्रकाश रतन सास्ते (३०, रा. भोकरदन, ह.मु. हुसेन कॉलनी) असे गुन्ह्यात मदत करणाऱ्याचे नाव आहे.

प्रकरणात १६ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती. २७ मार्च २०१९ रोजी सकाळी १० वाजता ती गल्लीत उभी होती. त्या वेळी तिच्या ओळखीचा आरोपी शेलार तेथे आला. तुला काही सांगायचे आहे असे म्हणत तिला सास्तेच्या घरात आणले. सायंकाळी आरोपीने तिला जेवण आणले. त्या वेळी सास्तेदेखील तेथे आला. आराेपीने तिला दोन दिवस डांबून ठेवले. ४ एप्रिल २०१९ रोजी दुपारी आरोपी शेलार दारू पिऊन आला. तिला धमकी देत अत्याचार केला. प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. तत्कालीन उपनिरीक्षक महादेव पुरी यांनी दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवळी सहायक लोकाभियोक्ता ज्ञानेश्वरी नागुला/डोली यांनी ४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपी शेलारला १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांचा दंड, पोक्सो कलमानुसार २० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंड, प्रकाशला तीन महिने सक्तमजुरी ठोठावली.

बातम्या आणखी आहेत...