आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:सतत नापिकी, त्यात कोरोनामुळे कामधंदा मिळत नसल्याने लोहा आणि विष्णुरीत दोन जणांनी केली आत्महत्या

नांदेडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सततची नापिकी व कोरोनामुळे कामधंदा मिळत नसल्याने लोहा तालुक्यातील सायाळ येथील शेख ख्वाजा शेख गफार (३२) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आणखी दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

शेख ख्वाजा शेख गफारच्या वडिलांच्या नावे दीड एकर शेत आहे. सतत नापिकी, कामधंदा मिळत नसल्याने घर कसे चालवावे या काळजीने शेख ख्वाजा यांनी १५ रोजी रात्री १० वाजता घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. हसीनाबी ख्वाजा शेख यांच्या फिर्यादीवरून लोहा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दुसऱ्या घटनेत खासगी कर्ज व ८० हजारांची म्हैस विकावी लागल्याने तुप्पा (ता.नांदेड) येथील रामराव माणिका टिपरसे (५२) यांनी कंटाळून शेतात विष घेऊन जीवन संपवले. त्यांना उपचारासाठी विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. १६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. संतोष टिप्परसे यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तर, तिसरी घटना मुखेड तालुक्यातील चौंडी येथे घडली. तायाबाई दादाराव किजवे (६५) यांनी राहत्या घरी १५ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्यांच्या वैद्यकीय कागदपत्रांवरून मुखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...