आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदा गर्भपात:फरार डाॅक्टर दांपत्याच्या शोधासाठी 3 पथके रवाना

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण तालुक्यातील चित्तेगाव येथे ‘औरंगाबाद स्त्री रोग रुग्णालय’ नावाने सुरू असलेल्या बेकायदा गर्भपात केंद्रावर गर्भपात केल्याने एका २२ वर्षीय विवाहितेची प्रकृती बिघडल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येताच शासकीय यंत्रणा कामाला लागली. दुसरीकडे गर्भपात करणारे डाॅक्टर दांपत्य फरार झाले असून त्यांच्या शोधार्थ तीन पथके रवाना केल्याची माहिती बिडकीन पोलिसांनी दिली.

दोन मुलींच्या पाठीवर पुन्हा मुलगी नको म्हणून नातेवाइकांसह मागील अनेक दिवसांपासून चित्तेगाव येथील या रुग्णालयात चकरा मागणाऱ्या गरोदर मातेवर अखेर अघोरी पद्धतीने तिचा गर्भपात केल्याने तिची प्रकृती खालावली. यातच नातेवाइकांनी तिला एका खाजगी रुग्णालयात रवाना केले. मात्र, तिची प्रकृती बिघडत चालल्याने तिला घाटी रुग्णालयात रवाना करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला. त्यामुळे नाइलाजाने या महिलेला घाटीत रवाना करण्यात आले. तिच्यावर घाटीत उपचार सुरू असताना गर्भपातासारख्या गंभीर गुन्ह्याची माहिती वैद्यकीय आधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे उघडकीस आली.

तपासासाठी पोलिस घाटीत : चितेगावमधील गर्भपात प्रकरणात पोलिस तपासासाठी घाटीत आले होते. यात पोलिसांनी संबंधित महिला व फॉरेन्सिक विभागालाही भेट दिली. महिला आयसीयूत उपचार घेत आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर यांनी दिली.

चार वर्षांपासून सुरू आहे केंद्र आरोपी अमोल जाधव आणि डॉ.सोनाली काळकुंबे-जाधव या दांपत्याकडे रुग्णालय चालवण्याचा परवानाच नसल्याची माहिती पुढे आली. विशेष म्हणजे येथे गेल्या चार वर्षांपासून अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याची कुजबूज परिसरातील लोक करत आहेत. मात्र, संबंधित यंत्रणा कशी काय अनभिज्ञ, असा प्रश्न उपस्थित होतो.

बातम्या आणखी आहेत...