आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदतीचा हात:अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी 3 हजार 501 कोटी निधी जिल्ह्यांना सुपूर्द

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जून जुलै ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत केली जाईल सांगितले होते. त्यानुसार 3 हजार 501 कोंटीचा मदतीचा अध्यादेश शनिवारी (10 सप्टेंबर) निघाला आहे. त्यानुसार वाढीव मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे

खात्यात रक्कम होणार जमा

राज्यात अतिवृष्टीमुळे 27 लाख 65 हजार 727 हेक्टरचे नुकसान झाले आहे. यामध्ये 23 लाख 89 हजार शेतकरी बाधित झाले आहेत. त्यासाठी राज्य सरकारने 3445 कोटीचा 25 लाख निधी मंजुर केला. तसेच जमीनी खरडून गेल्या त्यांच्यासाठी 56 कोटी असा 3501 कोटीचा निधी मंजुर झाला आहे. सर्व विभागीय आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. राज्य सरकारने वाढीव मदत दिलेली असून त्यानुसार शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.

अशी मिळणार आहे मदत

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून मिळून 3 हजार 501 कोटी निधी जिल्ह्यांना देण्यास मंजुरी देण्यात आली असून मदत व पुनर्वसन विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी 3 हेक्टरपर्यंत केली मदत

वाढीव मदतीप्रमाणे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 13600 प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर अशी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात येईल. यापुर्वी मदतीचे निकष हे केवळ दोन हेक्टर पर्यंतच होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मदत तीन हेक्टरपर्यंत केली आहे.

बातम्या आणखी आहेत...