आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Aurangabad
 • 30 30 Fraud Case Aurangabad | Sachin Rathod 30 30 Case Arresterd | Marathi News |After The Money Of The Investors In The Thirty Thirty Scam, Now The Water Is Back On The Investigation Of The Police Officers

कोर्टाने विचारली तपासातील प्रगती:तीस-तीस घोटाळ्यातील गुंतवणूकदारांच्या पैशानंतर आता पोलिस अधिकाऱ्यांच्या तपासावरही फेरले पाणी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • पोलिसांनी पुन्हा कोठडीची मागणी करताच कोर्टाने विचारली तपासातील प्रगती, तपास अधिकारी मात्र निरुत्तर

तीस-तीस घोटाळ्यातील गुंतवणूकदारांच्या पैशांवर पाणी फेरलेले आहे. मात्र, पोलिसांची चौकशी संथगतीने सुरू असल्यामुळे आता तपासाची दिशा भरकटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्य आरोपी संतोष ऊर्फ सचिन राठोड (४२, रा. कन्नड) यास सोमवारी न्यायालयात पुन्हा एकदा हजर केले हाेते. त्या वेळी पाेलिसांनी तपासासाठी आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली.

मात्र, दहा दिवस राठोडच्या तपासातील क्रम व सुसूत्रता सांगण्यातच तपास पथकाचे अधिकारी अपयशी झाले. परिणामी, न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळून लावत राठाेडची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तसेच, तपास करता येत नसेल तर दुसऱ्यांकडे वर्ग करावा का, इतरही एजन्सी आहेत, असे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले आहे.

या तब्बल ३६५ कोटींपर्यंत घोटाळ्यात आमदार ते पोलिस अधिकारी, शेतकरी, बांधकाम व्यावसायिक आणि सरकारी अधिकाऱ्यांचे पैसे अडकले आहेत. बिडकीन ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरुवातीला ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संतोष माने यांनी तपास केला. परंतु, गुन्ह्याची व्याप्ती वाढल्यानंतर २८ जानेवारी रोजी ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग केला. सुरुवातीला राठोडला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

त्यानंतर बिडकीन पोलिसांनी पुन्हा कोठडीची मागणी केल्यामुळे न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत वाढ केली हाेती. ३१ जानेवारीला दुपारी राठोडला न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली. परंतु, न्यायालयाने पोलिसांसमोर प्रश्न ठेवले. यात एकाही प्रश्नांचे तपास पथकाला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. परिणामी, न्यायालयाने पोलिसांची वाढीव कोठडीची मागणी फेटाळून लावली.

नाशिक, परभणीला गेलेले पथकही रिकाम्या हातीच परतले : यात राठोडला अटक केल्यानंतर मोठे खुलासे होण्याची शक्यता होती. मात्र, दहा दिवसांच्या पोलिस कोठडीतही पोलिसांना राठोडच्या नेटवर्क व्याप्तीची प्राथमिक माहिती गोळा करता आली नाही.

विशेष म्हणजे, एफआयआरमधील राठोड व्यतिरिक्त इतर आरोपींचा शोध घेण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरले. चौकशीत पोलिसांना २० एजंटची नावे मिळाली. मात्र, त्यांच्याकडून काहीही ठोस पुरावे पाेलिस गाेळा करू शकले नाही. तपासासाठी नाशिक, परभणीला गेलेले पथकदेखील रिकाम्या हातीच परत आले.

असा राहिला घटनाक्रम, पोलिसांसमोर मोठे आव्हान

 • राठोडने २०१३ मध्ये दामदुप्पट गुंतवणुकीचे आमिष दाखवून स्कीम सुरू केली.
 • २०१४--१५ मध्ये बिडकीन व आसपाच्या गावातील सुमारे २ हजार ३५१ हेक्टर जमिन दिल्ली, मुंबई कॉरिडॉरसाठी संपादित केली.
 • दुसऱ्या लॉकडाऊननंतर राठोड भूमिगत झाला व गुंतवणूकदारांची झोप उडाली. हा घोटाळा सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने समोर आणला.
 • जांभळी येथील एका महिलेच्या तक्रारीवरून १६ नोव्हेंबर रोजी बिडकीन पोलिसांनी राठोडवर पहिला गुन्हा दाखल केला. मात्र, काही तासांत एजंट त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि ढोबळेंनी शपथपत्र देत तक्रार नसल्याचे लिहून दिले.
 • त्यानंतर दोन महिने राज्याबाहेर फरार झालेला राठोड शहरात परतला आणि त्याने थेट माध्यमांकडे मुलाखत दिली. मुलाखतीनंतर २१ जानेवारी रोजी राठोडच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला व रात्रीतून त्याला अटक केली.
 • ३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीतील राठोडची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
 • या सर्व घटनाक्रमांनंतर पोलिसांसमोर आता या पुढील नेटवर्कसमोर आणने व इतर आरोपींचा शोध घेणे, गुंतवणूक कशी व कुठे झाली, याचा शोध घेण्याचे आव्हान आहे.

तज्ज्ञ म्हणतात क्रमच चुकला, आता जुळवाजुळव अवघड
तज्ज्ञांच्या मते, राठोडविरोधात दुसऱ्यांदा गुन्हा दाखल झाल्यानंतर आधीचे नेटवर्क, पैशांची गुंतवणूक, घोटाळ्याचे स्वरूप, गुंतवणूकदारांची माहिती, बँकेचा व्यवहार आदींविषयी सखोल तपास होणे अपेक्षित होते. गुन्ह्यांत बहुतांश पोलिस अधिकारी प्रथम तपास करतात. त्यानंतर सर्व ठोस पुराव्यानिशी अटक, अशी भूमिका घेताना दिसतात. मात्र, या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी प्रथम राठोडला अटक करण्याची घाई केली.

बातम्या आणखी आहेत...