आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफेब्रुवारीत होणाऱ्या जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहराचा कायापालट सुरू झाला आहे. या कामांसाठी शासनाने ५० कोटी रुपये दिले आहेत विशेष म्हणजे या कामांसाठी कंत्राटदारांनी सुमारे ३५ टक्के बिलोने टेंडर घेतले आहे. सुमारे ३० लाखांची कामे निविदेशिवाय काढण्यात आली आहेत, तर उर्वरित रकमेची कामे शॉर्ट टेंडर नोटीस देऊन काढण्यात आली आहेत.
जी-२० परिषदेच्या पूर्वतयारीसाठी रस्त्यांचे पॅचवर्क, दुभाजकांची रंगरंगोटी व सौंदर्यीकरण, स्वागत फ्लेक्स आणि बॅनर्स, ग्रीन बेल्ट विकसित करणे, वृक्ष लागवड, फुटपाथ सुशोभीकरण, आकर्षक दिव्यांची रोषणाई, उड्डाणपुलांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण तसेच वीज खांबांचे सौंदर्यीकरण अशी विविध कामे केली जाणार आहेत. यातील कामांच्या बहुतांश निविदा ३१ डिसेंबरपर्यंत काढण्यात आल्या असून ३१ जानेवारीपर्यंत बहुतांश कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.
निविदा तब्बल २४ ते ३५ टक्के कमी दराने महानगरपालिकेने अनेक कामांसाठी निविदा काढल्या आहेत. या कामांच्या बिलांसाठी ठेकेदारांना मनपाचे उंबरठे झिजवावे लागतात. जी-२० साठी मात्र थेट राज्य शासनाकडून ५० कोटींचा निधी आल्याने बिले तत्काळ निघतील या अपेक्षेने ठेकेदारांनी अंदाजपत्रकाच्या २४ ते ३५ टक्के कमी दराने निविदा भरल्या.
पाच प्रकारांच्या कामांसाठी ५० कोटी खर्चाचे बजेट ०५ कोटी : शहरातील रस्त्यांवरील भिंती, पूल, उड्डाणपूल यांची रंगरंगोटी ०५ कोटी : रस्त्यालगत उद्यानांचा विकास, सुशोभीकरण, रस्ता दुभाजकांमध्ये झाडे लावणे ३० कोटी : पालिका व शासनाच्या इतर विभागांच्या ज्या रस्त्यावरून जी-२० चे शिष्टमंडळ प्रवास करणार आहे असे रस्ते, दुभाजक, फुटपाथ, चौक यांची दुरुस्ती व सुशोभीकरण ०५ कोटी : मुख्य रस्त्यांवर व्हर्टिकल गार्डन उभारणे व हरित पट्ट्यांचे इल्युमिनेशन, कारंजे तयार करणे : ०५ कोटी : हेरिटेज साइट्स, उड्डाणपूल, शहरातील प्रमुख इमारती तसेच वाहतूक बेटे येथे आकर्षक इल्युमिनेशन म्हणजेच विद्युत रोषणाई
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.