आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा मिशन ढाबा मोहीममधून दणका:ढाबा मालकांसह 482 मद्यपींवर 30 फिरत्या पथकांमार्फत कारवाई

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ढाब्यावरील अवैध धंद्यांना पायबंद घालण्यासाठी मिशन ढाबा मोहीम उघडली आहे. त्या अंतर्गत धडक मोहीमेमध्ये औरंगाबाद विभागामध्ये एकूण 107 ढाब्यावर व ढाबामालकावर कार्यवाही करुन 482 मद्यपी विरुध्द कार्यवाही केली आहे. न्यायालयाने या प्रकरणी एकूण रुपये 17लाख 47 हजार 100 दंड ठोठावला आहे. तर आणखी शंभर प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याचे पवार यांनी सांगितले.

आयुक्त कांतीलाल उमाप व विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या निर्देशान्वये मराठवाडा विभागामध्ये परवानगी नसलेल्या हॉटेल, ढाब्यावर दारू पिण्यास कायदयाने बंदी असल्यामुळे अवैध ढाब्याविरुध्द कार्यवाहीची मोहीम राबविली आहे.

कायद्यांचे उल्लघंन केल्यावर गुन्हा

विभागातील आठ जिल्हायामध्ये असलेले अवैध ढाब्यावालेंची इत्यंभुत माहिती घेऊन कार्यवाहीचे नियोजन करुन ढाबा मालक अवैधपणे ढाब्यावर दारू पिण्यास जागा उपलब्ध करुन देणे व सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे हे मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 चे उल्लंघन करणे गुन्हा आहे.

जिल्ह्यात जाऊन कारवाई

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे अधिकृत परवाना कक्ष हॉटेल वरील निर्बधामुळे अवैध ढाब्यांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शासन महसुलावर विपरीत परिणाम झाला आहे. मराठवाडयातील 08 जिल्हयातील 30 ‍फिरती पथके वेगवेगळया जिल्हयात जाऊन ढाब्यावर कारवाई करण्यात येत आहे. मराठवाडा विभागातील अंदाजित 1000 ढाब्यावर सदरची कारवाई वारंवार करण्यात येत आहे.ढाब्यावर दारुचे सेवन करत असल्यास मद्यपी यांना सुध्दा अटक करुन करुन कारवाई करण्यात येत आहे.

जिल्हानिहाय कारवाई

(जिल्हाचे नाव, कारवाई केलेल्या ढाब्यांची संख्या, आरोपी दंड)

  • औरंगाबाद 22 ,178, 54,3000/-
  • बीड 13, 47,11100/-
  • उस्मानाबाद 17, 25,143500/-
  • जालना 06,36,170500/-
  • नांदेड 21,65,480300/-
  • लातुर 17, 80,392500/-
  • परभणी 08, 41, 6200/-
  • हिंगोली 03,100 /-

दोषींना त्वरीत शिक्षा

सदर धडक कार्यवाही मध्ये सर्व सामग्री (खुर्ची,टेबल ईत्यादी) जप्त करुन हॉटेल,ढाबा मालक व मद्यपी यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करुन त्वरीत न्यायालयात दोषारोप पत्र सादर करुन आरोपी यांना न्यायालयात सादर करुन न्यायालयाने दोषी विरुध्द त्वरीत द्रव्य दंडाची शिक्षा दिली आहे.

ढाब्यावरील कार्यवाही मध्ये उपायुक्त प्रदीप पवार, अधीक्षक संतोष झगडे, पराग नवलकर, अभिजित देशमुख, गणेश बारगजे,अतुल कानडे, केशव गो.राऊत, रविकिरण कोले व क्षेत्रीय निरीक्षक,भरारी पथक निरीक्षक, दुय्यम निरिक्षक,सहाय्यक दुय्यम निरिक्षक जवान यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला.

नागरिकांना आवाहन

नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी अवैध ठिकाणी मद्यसेवन करु नये,अवैध ठिकाणी बनावट,भेसळयुक्त मद्यविक्रीची शक्यता नाकारता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...