आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघटनांची निदर्शने:30 हजार कर्मचारी संपावर, 150 कोटींचे व्यवहार ठप्प;‎ दररोज निघतात 600 बिले, आज निघाली फक्त 141

छत्रपती संभाजीनगर‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कार्यालये ओस, संप लांबल्यास २५०० कोटींच्या बिलांवर परिणामाची शक्यता‎

जिल्ह्यातील ७० कर्मचारी संघटनांचे ३० हजार‎ सरकारी कर्मचारी या संपात सामील झाले आहेत.‎ त्यामुळे एेन मार्चअखेरच्या टप्प्यावर कोषागार‎ कार्यालयातून बिले काढण्याची दररोजची १५०‎ कोटींची प्रक्रिया ठप्प झाली आहे. कोषागार‎ कार्यालयात दररोज सहाशे बिले‎ सादरीकरणासाठी येतात, मात्र संपाच्या पहिल्या‎ दिवशी फक्त १४१ बिले दाखल झाली. संप‎ असाच सुरू राहिला तर येत्या पंधरा दिवसांत दोन‎ हजार कोटींपेक्षा अधिक बिलांवर त्याचा विपरीत‎ परिणाम होण्याची शक्यता आहे. कोषागार‎ विभागात दरवर्षी १२ हजार कोटींची बिले‎ निघतात. त्यातील ३० टक्के बिले मार्च महिन्यात‎ निघतात. त्यात ४० हजार कर्मचाऱ्यांची वेतन‎ आणि निवृत्तिवेतनाची २४० कोटी रुपयांची बिले‎ आहेत. सध्या पंधरा तारखेपर्यंत ५८० कोटीची‎ बिले निघाली आहेत. संप लांबला तर अडीच‎ हजार कोटींच्या बिलांवर त्याचा परिणाम होण्याची‎ शक्यता आहे.‎

७० कर्मचारी संघटना, ३०‎ हजार कर्मचारी सहभागी‎ राज्य सरकारी कर्मचारी संघटना,‎ महसूल कर्मचारी संघटना, तलाठी‎ संघटना, भूमी अभिलेख, कोषागार,‎ जिल्हा परिषद कर्मचारी, जीएसटी‎ कार्यालय, आरटीओ, सार्वजनिक‎ बांधकाम, जलसंपदा विभाग,‎ परिचारिका संघटना, चतुर्थ श्रेणी‎ कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष‎ संघटनेचे देविदास जरारे, तलाठी‎ संघाचे राज्य अध्यक्ष अनिल‎ सूर्यवंशी, महसूल कर्मचारी‎ संघटनेचे परेश खोसरे आणि‎ शासकीय परिचारिका संघटनेच्या‎ राज्य अध्यक्ष इंदुमती थोरात यांनी‎ नेतृत्व केले. राज्य सरकारी कर्मचारी‎ संघटनेचे १६ हजार तर शिक्षक‎ आणि शिक्षकेतर १४ हजार कर्मचारी‎ संपात सहभागी झाले.‎

बातम्या आणखी आहेत...