आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिरामल:चार कंपन्यांची ऑरिकमध्ये 300 कोटींची गुंतवणूक ; काॅस्मोने खरेदी केली 170,138 एकर जमीन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीअंतर्गत विविध मोठ्या उद्योगांच्या गुंतवणुकीची चर्चा असते. मात्र, लहान उद्योगही शहराची उलाढाल आणि रोजगारात हळूहळू मोठी भर घालत आहेत. ऑगस्ट महिन्यात ऑरिक सिटीत उमा सन्स, फायटोमॅक्स, ऑरिक ग्रीन सोल्युशन्स आणि ग्रीन रॉड व्हेंचर या चार कंपन्यांनी ३०० कोटींची गुंतवणूक केली. त्यातून ३४३ जणांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती ऑरिकच्या सूत्रांनी दिली.

दोन हजार एकरांवर असलेल्या शेंद्रा येथील ऑरिक सिटीतील ७० टक्के जमिनी विविध उद्योगांनी खरेदी केल्या आहेत. दिल्ली-मुंबई कॉरिडॉरअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या ऑरिक सिटीमध्ये एकूण १० हजार एकर जमीन अधिग्रहीत करण्यात आली. यामध्ये २ हजार एकर शेंद्र्यात, तर अडीच हजार एकर बिडकीनमध्ये आहे. शेंद्रा येथील ९७ टक्के जागांचे वाटप झाले आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वच उद्योगांना बिडकीनमध्ये जागा दिली जाणार आहे. एआयटीलने संपूर्ण लक्ष बिडकीनच्या विकासावर केंद्रित केले आहे. अडीच हजार एकरांत प्लॉट आणि इतर सुविधा उभारल्या आहेत. याशिवाय ५०० एकरांत फूड पार्कचेही नियोजन आहे. उर्वरित ७ हजार एकरचेही नियोजन लवकरच होईल. शेंद्र्यात आतापर्यंत कापड, फार्मा, वैद्यकीय उपकरणे, खाद्यपदार्थ, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे.

महिनाभरात २७०० जणांना रोजगाराची सुवर्णसंधी
गेल्या महिन्यात पिरामल आणि काॅस्मो या दोन मोठ्या कंपन्यांनी अनुक्रमे १७० आणि १३८ एकर जागा खरेदी केली. दोन्हींची एकूण गुंतवणूक २ हजार कोटींची आहे, तर २७०० जणांना यातून रोजगारही मिळणार आहे. त्यामुळे शहरातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल.

बातम्या आणखी आहेत...