आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयटीत प्रारंभ कल्पकता:हॅकेथॉन च्या महाअंतिम फेरीत नऊ राज्यांतील ३०० विद्यार्थी; संशोधनाच्या निकषावर आज निर्णय

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सामाजिक, आरोग्यविषयक किंवा उद्याेग क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी तरुणाईच्या कल्पकतेचा, संशोधनाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमधील याच कलागुणांना वाव देण्यासाठी शहरातील ‘एमआयटी’ महाविद्यालयात देशपातळीवरील ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२२’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रासह नऊ राज्यांतील २६ संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघात सुमारे पाच विद्यार्थी आहेत. म्हणजे या स्पर्धेत १३० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हे देशासमोरील आव्हाने सोडवण्यासाठी आणि तरुणांमधून नवे स्टार्टप सुरू करण्यासाठी उदयास आलेले एक व्यासपीठ आहे, अशी माहिती या स्पर्धेच्या समन्वयक डॉ. भक्ती अहिरवाडकर, डॉ. बी. एस. सोनवणे, नोडल सेंटरचे प्रमुख ऋतुराज हल्पनवार यांनी दिली. गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस या स्पर्धेची महाअंतिम फेरी होत आहे. स्पर्धेचा शुभारंभ गलगोटीयास विद्यापीठ, नोएडा येथून ऑनलाइन करण्यात आला. एमआयटी नोडल केंद्रावर सहभागी विद्यार्थ्यांना महासंचालक मुनीश शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डायरेक्टर डॉ. संतोष भोसले, अनुज कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

ड्रोन-रोबाेटिक्ससह चार विषयांवर नावीन्याचा शोध
या वर्षीच्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२२ स्पर्धेसाठी देशपातळीवर एकूण १६ विषय आहेत. त्यापैकी एमआयटी औरंगाबाद नोडल केंद्रावर “रोबोटिक्स आणि ड्रोन, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता आणि हरित तंत्रज्ञान, ट्रान्स्पोर्टेशन आणि लॉजिस्टिक्स’ हे विषय देण्यात आले आहेत. या विषयांवरील सॉफ्टवेअर एडिन्सचे मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर केले असून उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ याचे मूल्यांकन करत आहेत. उद्या शुक्रवारी सायंकाळी या स्पर्धेतून निवड झालेल्यांची नावे जाहीर करण्यात येतील.

बातम्या आणखी आहेत...