आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद विभागाचा निकालात यंदा घट:गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.01 टक्के कमी तर 12 हजार 087 विद्यार्थ्यांना 90 पेक्षा जास्त गुण

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने जाहिर करण्यात आला. यंदा औरंगाबाद विभागाचा निकाल 96.33 टक्के लागला आहे. हा विभागाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.01 टक्क्यांनी कमी लागला असून, 2020 मध्ये परीक्षेचा निकाल 95.30 टक्के होता. तर 2021 मध्ये परीक्षा न घेता लागलेल्या निकालात 3.01 टक्क्याने वाढ झाली होती. मात्र यंदाचा निकाल हा होम सेंटर आणि लिहिण्यासाठी वेळ वाढवून देऊनही केवळ 2 टक्केच विद्यार्थी पूर्णवेळ लिहू शकल्याने लागला आहे.

औरंगाबाद विभागातून या परीक्षेसाठी 1 लाख 79 हजार 333 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 77 हजार 327 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 1 लाख 70 हजार 831 जण उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेसाठी विभागातून एकूण 98 हजार 900 विद्यार्थी तर 78 हजार 427 विद्यार्थीनी बसल्या होत्या. त्यापैकी 76 हजार 549 विद्यार्थीनी तर 94 हजार 282 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 95.33 टक्के आणि विद्यार्थीनींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 97.60 टक्के इतकी आहे.

असा आहे जिल्हानिहाय निकाल -

औरंगाबाद 97.01 टक्के

बीड 97.20 टक्के

परभणी 95.37 टक्के

जालना 95.44 टक्के

हिंगोली 94.77 टक्के

एकूण निकाल - 96.33 टक्के

अशी आहे आकडेवारी -

90 पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी 12087

85 ते 90 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी 21826

80 ते 85 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी 26319

75 ते 80 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी 25370

70 ते 75 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी 22954

65 ते 70 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी 19680

60 ते 65 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी 16680

45 ते 60 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी 23509

45 टक्के मिळवणारे विद्यार्थी 7187

जिल्हानिहाय गैरप्रकार

औरंगाबादमध्ये 12 गैरप्रकार हे परीक्षा केंद्रांवरील आहेत. तर 24 गैरप्रकार परीक्षाेत्तर आहेत. परभणीत केंद्रावर 1 तर परीक्षाेत्तर 17, हिंगाेलीत अनुक्रमे 8 व 3 गैरप्रकार आहेत. जालना व बीडमध्ये परीक्षाेत्तर गैरप्रकाराची प्रकरणे अनुक्रमे 21 व 17 अशी आहेत.

बातम्या आणखी आहेत...