आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकारने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १६ ऑगस्टपासून ७५ वर्षांवरील नागरिकांना विनामूल्य बससेवा योजना लागू केली. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. १ एप्रिल ते जानेवारी यादरम्यान १६३ कोटी ८ लाख रुपये उत्पन्न मिळाले. यात अर्ध्या तिकिटाचे २०.४९ कोटी आणि ७५ वर्षांच्या प्रवाशांचे १६.२० कोटी रुपये शासनाला द्यावे लागतील.
अर्थसंकल्पात सरकारने महिलांसाठी ५० टक्के दरात बससेवा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पूर्वी ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी विनामूल्य बससेवा सुरू केली आहे. त्याआधी ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी ५० टक्के, अपंग, पुरस्कार प्राप्त सामाजसेवक, पत्रकार आदींसाठी प्रवाससेवेत १०० टक्के सूट दिली आहे. सवलतीच्या दरात बस धावली तर त्याचे परिणाम काय होत आहेत? याबाबत ‘दिव्य मराठी’ने जाणून घेतले असता, सरकारचे धोरण एसटी महामंडळासाठी उपयुक्त ठरत आहे. विविध मार्गावर रिकाम्या धावणाऱ्या बस आता हाऊसफुल्ल होऊन धावू लागल्या आहेत. प्रवासी संख्या वाढली. त्या तुलनेत बसची संख्या कमी पडत आहे. बसण्यासाठी जागा मिळत नसल्याने अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो. मात्र, यासाठी सरकारला तिकिटाच्या रकमेचा मोठा भारही उचलावा लागत आहे.
६५ वर्षांवरील ज्येष्ठांच्या प्रवासी संख्येत वाढ ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी अर्धे तिकीट दर सेवा लागू करण्यात आलेली आहे. त्याचा जानेवारी २०२३ मध्ये १ लाख ७४ हजार ५८४ प्रवाशांनी लाभ घेतला होता. फेब्रुवारीत २.८७ लाख, एप्रिलमध्ये ४.४५ लाख प्रवाशांनी सवलतीचा लाभ घेतला. मे महिन्यात ही प्रवासी संख्या ६.२० लाखांवर जाऊन पोहोचली. १ जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या दरम्यान एकूण ६२ लाख ६ हजार १४३ ज्येष्ठ नागरिकांनी अर्धे तिकीट दर सवलतीत प्रवास सेवेचा लाभ घेतला. तर अर्धी रक्कम २० कोटी ४९ लाख ४२ हजार ३६० रुपये सरकारकडे बाकी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.