आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण प्रेमी:भांगसीमाता गडावर 32 पोती कचरा जमा; पर्यावरणप्रेमींतर्फे शेकडो रोपांची लागवड

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्याला सुरुवात होताच पर्यावरणप्रेमींनी भांगसीमाता गडावर स्वच्छता मोहीम, श्रमदान आणि वृक्षारोपण उपक्रम राबवला. यात ३२ पोती कचरा जमा करून १०० हून अधिक विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.

आदर्श मित्रमंडळ व टेकडी पर्यावरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी सेवाकऱ्यांनी पहाटे ६:३० ते १० या वेळेत श्रमदान केले. गडावर येणाऱ्या पर्यावरण, निसर्गप्रेमींनी श्रमदानासाठी हातभार लावला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष सुहास दाणी, सचिव सत्यविजय देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, सहसचिव मारुती आवलगावे, जितेंद्र कुलकर्णी, उपक्रम प्रमुख दत्ता वाकडे, गणेश प्रधान, गजानन नांदुरकर, प्रमोद देशमुख, बापुसाहेब लगड, रूपचंद अग्रवाल, नवनाथ राजे, राजू मोरे, केशव ढोले, दिलीप डबडे, गुनवंत हंगरगेकर, संजय फलटने, अमर निकम, अर्जुनसिंग चव्हाण, नितीन गवते, संतोष कुलकर्णी, राजेंद्र वायकोस, दिलीप आजबे, पुरुषोत्तम जोशी, वसंत जाधव, नीलेश पनजकर, सिद्धेश पनजकर, वाकडे परिवार आदींनी योगदान दिले.