आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यक्रम:“प्रगतिशील’चे 32 जण अनुभवणार पहिल्यांदाच विमानाचा प्रवास

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेतर्फे ७ नोव्हेंबर रोजी ३२ ज्येष्ठ नागरिक पहिल्यांदाच विमानाने जग्गनाथ पुरीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. सिडको एन-५ गीता भवनच्या प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. सोमवारी ७ वाजता औरंगाबादहून मुंबईला पोहोचेल. तेथूूनच विमानाने भुवनेश्वरला जातील. त्रिपुरारी पौर्णिमेला ज्येष्ठांना जगन्नाथपुरी मंदिराचे दर्शन घडेल. ८ ते १० तारखेपर्यंत चिंता सरोवर, बोटिंग, जंगल सफारी, विविध ऐतिहासिक मंदिरे पाहून ११ तारखेला मुंबईला परततील. या सहलीत ८० वर्षांचे विलास जोशी सहभागी होत आहेत. यामुळे सहलीचा आनंद द्विगुणित होईल, असे अध्यक्ष भरत कुलकर्णी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...