आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:किराणा दुकान फोडून 32 प्रकारचे साहित्य लंपास

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुंडलिकनगर परिसरातील किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी रात्रीतून ३२ प्रकारचे किराणा साहित्य लंपास केले. हा प्रकार ४ नोव्हेंबर रोजी समोर आला. यात चोरट्यांनी तेल, तांदूळ, लोणचे, क्रीमसह वजन काटादेखील नेला. अरिहंतनगरातील राम सखाराम शिंदे (४३) यांचे पुंडलिकनगरात स्वामी समर्थ केंद्राजवळ श्री स्वामी समर्थ किराणा दुकान आहे. ते ३ नोव्हेंबर रोजी दुकान बंद करून गेले. मात्र, मध्यरात्रीतून चोरांनी दुकानाचे शटर एका बाजूने उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील एकूण ३३ प्रकारचे साहित्य लंपास केले. यात तेलाचे सात बॉक्स, सुकामेवा, चहा पावडर, साखर, तांदूळ, साबण, बिस्किटे, खारीक, खोबरे, वजन काटा लंपास केला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...