आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम:मालमत्ता कराचे सहा लाखांचे 320 चेक बाउन्स ; धनादेशाद्वारे कराचा भरणा

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाने मालमत्ता वसुलीची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे अनेक जण धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात. पण बँकेत पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश वटत नाहीत. चालू आर्थिक वर्षात सहा लाखांचे ३२० धनादेश वटले नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणांत तातडीने कारवाई करून मनपाने शंभर टक्के वसुली केली आहे.

चालू आर्थिक वर्षात महापालिकेचे मालमत्ता कराचे ३५० कोटी तर पाणीपट्टीचे १३० कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत मालमत्ता कराचे ५०.७२ कोटी आणि पाणीपट्टीचे ९.३८ कोटी मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. ही रक्कम अनेकांनी धनादेशाद्वारे महापालिकेला दिलेली आहे. मात्र यातील पाच ते सहा लाखांपर्यंतचे ३२० धनादेश वटले नव्हते. त्यामुळे तातडीने त्यांच्याविरोधात कारवाई सुरू करण्यात आली. नोटीस बजावताच ३२० जणांनी रक्कम जमा केली.

१३८ नुसार कारवाई होणार मालमत्ता कर, पाणीपट्टीपोटी दिलेले धनादेश न वटल्याच्या फायली पूर्वी महिनोन‌्महिने पडून असत. त्यामुळे प्रशासनाने आता त्यावर कलम १३८ नुसार तातडीने कारवाई सुरू केली आहे. धनादेश अनादरप्रकरणी गुन्हे दाखल केले जातील, असे उपायुक्त तथा कर निर्धारक व संकलक अपर्णा थेटे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...