आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातील 33 कोरोना बाधीत रुग्ण ठणठणीत, हिंगोली जिल्हा कोरोना मुक्तीकडे

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना शुक्रवारी (ता. 15) शासकीय रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली  आहे. आता  हिंगोलीची वाटचाल कोरोना मुक्तीकडे सुरू आहे.

हिंगोली येथील राज्य राखीव दलाचे जवान मालेगाव वन मुंबई येथून बंदोबस्तावर परतल्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.  त्यानंतर त्यांचे स्वॅब नमुने तपासल्यानंतर 84 जवान कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले.

 या प्रकारानंतर जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, राखीव दलाचे समादेशक मंचक इप्पर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, पालिका मुख्याधिकारी रामदास पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.  गोपाल कदम, डॉ. संजीवन लखमावार, डॉ. अरुण जिरवणकर, डॉ. राहूल राळेगांवकर यांच्या बैठकीत सर्व जवानांना स्वतंत्र खोलीत ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार हिंगोली शहरातील काही मंगल कार्यालय देखील ताब्यात घेण्यात आले. 

दरम्यान सेनगाव तालुक्यातील जांभरून रोडगे येथील 2 हिंगोली तालुक्यातील हिवराबेल येथील 2 तर वसमत येथील 2 रुग्ण तर शासकीय रुग्णालयातील 1 परिचारिका कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कन्टोनमेंट झोन जाहीर करून संचारबंदीची अधिक कडक अमलबजावणी करण्यात आली.

दरम्यान या जवानांचा  १४ दिवसाचा कालावधी संपल्यानंतर त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. सदरील नमुने निगेटिव्ह आल्यानंतर हळूहळू जवानांना सुट्टी देण्यात आली. आज दुपारपर्यंत जिल्ह्यात 43 कोरोना बाधित रुग्ण शिल्लक राहिले होते. 

दरम्यान सायंकाळी हिंगोलीकरांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी आली. यामध्ये 33 जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना रात्री रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यामध्ये राज्य राखीव बलाचे 32 जवान तर जिल्हा सामान्य रुग्णालयामधील 1 परीचारीकेचा समावेश आहे.  

दरम्यान सध्या जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण 10 रुग्ण त्यापैकी 9 जण औरंगाबाद येथे तर 1 जण हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरामार्फत औषधोपचार सुरु असुन सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

नागरिकांनी सतर्क राहून कोरोना विरुध्द लढ्यासाठी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. घरी थांबून आपली आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच जिल्हा  प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...