आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा प्रशासनाची विनंती:‘समांतर’चा 335 कोटींचा निधी नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी द्या ; राज्य सरकारकडे मागणी

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जुनी समांतर योजना बारगळळी. त्याचा उरलेला १६० कोटींचा निधी व त्यावरील व्याज १७५ कोटी असे एकूण ३३५ कोटी रुपये शिल्लक आहेत. हा निधी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या वापरासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र मनपा प्रशासनाने राज्य शासनाला पाठवले आहे.

केंद्र शासनाने शहरासाठी समांतर पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. त्याला केंद्राकडून १४७ कोटी आणि राज्य शासनाकडून १७ कोटी असा एकूण १६० कोटी रुपयांचा निधी महापालिकेला २००८-०९ मध्ये मिळाला होता. पण या योजनेचे काम सुरू होण्यास आठ वर्षांचा कालावधी लागला. दरम्यानच्या काळात मनपाने १६० कोटी रुपयांचा निधी बँकेत जमा ठेवला. या निधीवर १७५ कोटी रुपयांचे व्याज मिळाले आहे. मूळ रक्कम आणि व्याज असा एकूण ३३५ कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. दरम्यानच्या काळात ही योजनाच बारगळली. आता राज्य शासनाने शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. यासाठी राज्य शासन ७० टक्के तर मनपा ३० टक्के निधी उपलब्ध करून देईल असा करार आहे. अर्थसंकल्पात राज्य शासनाने ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही केली आहे. त्यासोबतच मनपाकडील रक्कम देखील उपयोगात आणली जात आहे. आतापर्यंत महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ९३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी एसपीएमएल कंपनीला देखील करार रद्द करण्यासाठी २९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे.

हिस्सा भरण्यासाठी मनपाला हवेत पैसे सध्याची १६८० कोटींची योजना राहिली तर मनपाला ६३३ कोटी रुपये या योजनेसाठी द्यावे लागणार आहेत. मात्र ही योजना केंद्राच्या अमृत दोनमधून झाली तर योजना २७०० कोटींची होईल. मात्र मनपला त्यात किती हिस्सा भरायचा हे अजून ठरलेले नाही. विशेष म्हणजे मनपाची हिस्सा भरण्याची आर्थिक परिस्थिती नाही. त्यासाठी समांतरचा शिल्लक निधी वापरण्याची परवानगी मिळावी, यासाठी पत्रव्यवहार सुरू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...