आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसर्गजन्य आजार:शहरात स्वाइन फ्लूचे 34 रुग्ण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात स्वाइन फ्लू आजाराचे ३४ रुग्ण आढळले आहेत. हा संसर्गजन्य आजार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे. साधारणतः ताप, घसा दुखणे, खोकला, नाक गळणे, अंग व डोकेदुखी अशी या आजाराची कोरोनासारखीच लक्षणे आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यभरात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने आराेग्य विभागाने कोरोनासारखी याची चाचणीदेखील सुरू केली आहे. सध्या घाटी रुग्णालयात मोफत चाचणी केली जात आहे. स्वाइन फ्लू आजारासारखी लक्षणे दिसताच नागरिकांनी चाचणी घ्यावी. ऑगस्टमध्ये घाटीच्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यात ३४ जणांचे अहवाल स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह निघाले. या आजाराची लक्षणे कोरोनासारखीच आहेत. ताप, घसा दुखणे, सर्दीने नाक गळणे, खोकला, अतिसार व उलट्या, अंग व डोकेदुखी, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास अशी या संसर्गजन्य आजाराची लक्षणे आहेत.

आता स्वाइन फ्लूचीही घ्या लस : शासनाने कोरोनाप्रमाणेच स्वाइन फ्लूची लस उपलब्ध करून दिली आहे. ही लस पालिकेच्या एन-८ सिडको, एन-११ सिडको, सिल्क मिल कॉलनी, बन्सीलालनगर, कैसर कॉलनी या रुग्णालयात मिळेल. ही लस ऐच्छिक आहे.

अशी घ्या काळजी : वारंवार साबणाने हात धुवा
शिंकताना रुमाल, कपड्याने तोंड झाका } नाक, चेहरा व डोळ्यांना स्पर्श केल्यानंतर हात साबणाने धुवा. { स्वाइन फ्लूसारखी लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहा. { पौष्टिक आहार घ्या, खूप पाणी प्या. धूम्रपान करू नका.

या गोष्टी टाळा : एकमेकांच्या हातात हात देऊ नका. {सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका { डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच औषधी घ्या. { स्वाइन फ्लूसारखी लक्षणे दिसल्यास गर्दीत जाऊ नका. {या व्यक्तींना स्वाइन फ्लू धोक्याचा { पाच वर्षांखालील मुले { गरोदर माता, मधुमेह, स्थूलत्व { - ६५ वर्षांवरील व्यक्ती { रक्तदाब, हृदयरोगाच्या व्यक्ती.

बातम्या आणखी आहेत...