आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 जणांच्या टोळीकडून फसवणूक:कौन बनेगा करोडपतीमध्ये बक्षीस लागल्याचे सांगत 34 लाखांना गंडा; हर्सूल पोलिसांत गुन्हा दाखल

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या लकी ड्रॉ मध्ये तुमचा क्रमांक लागला आहे. त्यात जवळपास एक कोटी रुपये मिळणार असून त्याच्या करासाठी तुम्हाला काही रक्कम अदा करावी लागेल, असे सांगत सायबर गुन्हेगाराने कंपनीतील कामगाराकडून सुरूवातीला 4 हजार रुपये घेतले. कामगाराचा विश्वास बसून त्याने देताच पुढे अकरा महिन्यात सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील सतरा जणांनी त्या एका कारणावर त्याच्याकडून 34 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नुकताच शहराच्या हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बजाज कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या सुधाकर मारोती खंडागळे (५८) यांना काही महिन्यांपुर्वी व्हॉट्स ऍपवर लॉटरी लागल्याचा मेसेज आला होता. केबीसी च्या स्लोगन सह इतर विविध छायाचित्रांचा त्यात समावेश असल्याने खंडागळे यांचा विश्वास बसला. कॉलवरील सजिंद मोंडाल नामक व्यक्तीने त्यांना 1 कोटी 15 लाख रुपये देण्यासाठी पहिले 1 लाख 70 हजार रुपये कर भरावा लागेल. त्यासाठी त्यांनी सुरूवातीला 5 हजार रुपये तत्काळ पाठवावे लागतील. खंडागळे यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर पैसे पाठवले. जानेवारी महिन्यापासून पुढील काही दिवसात त्यांनी टप्प्या टप्प्यात 3 लाख रुपये दिले. खंडागळे पैसे देताय हे सायबर गुन्हेगारांच्या लक्षात येताच एक दोन सायबर गुन्हेगारापर्यंत मर्यादीत न राहता मे महिन्यापर्यंत तब्बल 17 जणांनी विविध कारणे सांगून त्यांच्याकडून एकून 34 लाख 6 हजार 497 रुपये उकळले. यात सर्व रक्कम राष्ट्रिय बँकांच्या खात्यावर जमा झाल्यात, हे विशेष. त्यात 17 जणांमध्ये एक महिला तर 16 पुरूष आरोपींचा समावेश आहे.

पोलिसांनी समजून सांगूनही वाटत होते पैसे येतील

खंडागळे यांचा सायबर गुन्हेगारांवर टोकाचा विश्वास बसला होता. कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तींच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी नातेवाईकांकडून उसणे पैसे घेऊन सायबर गुन्हेगांराना दिले. आयुष्यभर जमापुंजी केलेली देखील दिली.

पत्नी, मुलांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पैसे मिळतील, ही आशा कायम होती. पत्नी, मुलाने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलिसांनी त्यांची समजून घातल्यानंतर मात्र त्यांना फसवणूक लक्षात आली व ते तक्रार देण्यास तयार झाले. त्यावरुन हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...