आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदांसाठी प्रक्रिया:‘एमपीएससी’च्या भरतीत 340 पदे वाढली; गट अ, ब पदांचा समावेश

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा २०२२ मध्ये ३४० पदांची भर पडली आहे. यात उपजिल्हाधिकारी गट अ संवर्गाची ३३, पोलिस उपअधीक्षक गट अ संवर्गाची ४१, सहायक राज्यकर आयुक्त गट अ संवर्गाची ४७, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट अ संवर्गाची १४, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ संवर्गाची दोन शिक्षणाधिकारी गट असंवर्गाची २०, प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी) गट असंवर्गाची सहा, तहसीलदार गट असंवर्गाची २५. सहायक गटविकास अधिकारी गट ब संवर्गाची ८०, उपअधीक्षक भूमी अभिलेख गट ब संवर्गाची तीन, सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब संवर्गाची दोन, उपशिक्षणाधिकारी गट ब संवर्गाची २५, सहायक प्रकल्प अधिकारी गट ब संवर्गाची ४२ पदांचा समावेश असल्याचे एमपीएससीने नमूद केले. २१ ऑगस्ट राेजी राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२२ राज्यभरातील केंद्रांवर घेण्यात अाली.

आता एकूण ५०१ पदांसाठी प्रक्रिया
एमपीएससीतर्फे ११ मे रोजी राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२२ ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात १६१ पदांचा समावेश होता. मात्र, शासनाकडून आता अन्य पदांची मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आल्याने ही पदे राज्यसेवा २०२२ च्या पदभरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. राज्यसेवा २०२२ च्या जाहिरातीमध्ये केवळ १६१ पदेच असल्याने स्पर्धा परीक्षार्थींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आता गट अ आणि गट ब संवर्गाची मिळून ३४० पदे वाढल्याने एकूण ५०१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल, त्यामुळे उमेदवारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...