आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्ण:महामाया केंद्रात ३४४ जणांची तपासणी; बीपी-शुगरचे 126, दंतरोगाचे 51 रुग्ण

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाच्या महामाया आरोग्य केंद्र, गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र व सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कबीरनगरात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. यात १२६ जणांमध्ये हायपर टेन्शन, बीपी, शुगरचे रुग्ण सर्वाधिक, ७४ रुग्णांना डोळ्यांचे आजार, तर ५१ रुग्ण दंतरोगसंबंधित आढळून आले. एकूणच शिबिरात ३४४ जणांची तपासणी करण्यात आली.

कबीरनगर येथील आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य शिबिर झाले. या शिबिरात मिलिंदनगर, मुरलीधरनगर, कबीरनगर व नागसेननगर परिसरातील वस्तीत शिबिरपूर्व जाणीव जागृती करण्यात आली. शिबिरात डॉ. माधुरी कापले, डॉ. मोहंमद शेख, दंतरोगतज्ज्ञ डॉ. विशाखा बागल, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. बीसीता खान, लॅब टेक्निशियन अजिंक्य जैन, सुनय खान यांनी रुग्णांची तपासणी केली.

कार्यक्रमात गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र, एनएसडीएल आरोग्य प्रकल्पाच्या वतीने आरोग्य जाणीव जागृतीसाठी केंद्रात विविध आजारांसह व्यसनाधीनता, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता या विषयावर आधारित पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले. शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक राहुल सोनवणे यांच्या हस्ते झाले. या वेळी महिला विभागप्रमुख सविता कुलकर्णी, आरोग्य केंद्राच्या सिस्टर सुनीता नरवडे, सोनाली जाधव, प्रिया पांचाळ, अश्विनी बोडके, आरोग्य प्रकल्पाचे राजेंद्र राक्षे, पिराजी कमले, मेघा जाधव यांच्यासह रुग्ण व नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...