आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:उसाच्या शेतातून 21 लाख रुपये किंमतीची 345 गांजाची झाडे जप्त, एका शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील हपसापूर शहरामध्ये उसाच्या शेतात मध्ये लावण्यात आलेली 345 गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली असून दोन क्विंटल 73 किलो वजनाच्या या झाडांची किंमत 21 लाख 87 हजार रुपये एवढी आहे. याप्रकरणी एका शेतकऱ्याविरुद्ध हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये विशेषतः औंढा, वसमत तालुक्यांमध्ये गांजाची शेती आढळून येत आहे. यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी पाच ठिकाणी छापे टाकून गांजाची शेती उद्ध्वस्त केली होती. त्यानंतर आता वसमत तालुक्यातील हपसापूर शिवारात नामदेव सवंडकर यांच्या शेतात उसाच्या पिकांमध्ये गांजाची झाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

सदर माहितीची खात्री केल्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक सतीश देशमुख, हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनपवार, जमादार शेषराव लाखाडे, शेख इमरान कादरी, महेश अवचार, अरविंद पवार, राजाराम कदम, विशाल काळे, सुरज भिसे, दांडेकर यांच्या पथकाने मंगळवारी ता. 17 दुपारी शेतात छापा टाकून गांजाची झाडे जप्त केली आहे. या शेतात असलेली गांजाची 345 झाडे पोलिसांनी उपटून टाकले आहेत. या झाडांचे वजन 2 क्विंटल 73 किलो असून त्याची किंमत 21 लाख 87 हजार रुपये एवढी आहे. याप्रकरणी नामदेव सवंडकर यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक उदय खंडेराय पुढील तपास करीत आहेत.

गांजा विक्रीचे वसमत, नांदेड कनेक्शन

यासंदर्भात हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित शेतकऱ्यांनी यापूर्वी शेतामध्ये तीन ते चार झाडे लावली होती. सदर झाडे वसमत व नांदेड येथील काही व्यक्ती घेऊन जात असल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी वसमत, नांदेड च्या त्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. तर या वेळी तब्बल दीड एकर क्षेत्रातील उसाच्या शेतात गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले.

बातम्या आणखी आहेत...