आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

450 मतदारांवर अन्यायाची भिती:35 सोसायट्यानंतर बाजारसमितीची निवडणूक घ्यावी; माजी सभापती पठाडे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात ३५ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची (सोसायटी) निवडणूक प्रक्रिया बाकी आहे. तरीही बाजार समितीची निवडणूक जाहीर केली. यामुळे साडेचारशेवर मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहातील. म्हणून शासन व प्रशासनाने बाजार समिती निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

त्यांनी सांगितले की, एकट्या औरंगाबाद तालुक्यात एकुण ७६ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत. त्यापैकी १६ संस्था कार्यरत आहे. ६० संस्थेची मुदत १ सप्टेंबर पूर्वीच संपलेली आहे. २५ संस्थेच्या निवडणूक कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. मात्र, ३५ संस्थांच्या निवडणूक घेणे बाकी आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ६ सप्टेंबर रोजी बाजार समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे ३५ संस्था व त्यातील एकुण साडेचारशेवर मतदार समितीच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहातील. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होईल. त्यामुळे आधी सहकारी संस्थांची निवडणूक घेण्यात यावी. यावेळी श्रीराम शेळके, रामकिसन भोसले, अगाजी दांडगे, अजय पळसकर, सजनराव मते आदी उपस्थित होते.

प्रशासक म्हणून येण्यास धडपड
नवे सरकार येताच बाजार समितीवरील मविआचे प्रशासक मंडळ हटवण्यात आले. तेथे भाजप शिंदे गटाचे प्रशासक मंडळ नियुक्तीसाठी वेगाने हालचाली सुरु आहेत. त्याला न्यायालयीन अडथळाही आहे. यावर मात करून प्रशासक होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी बाजार समिती निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी केली का? या प्रश्नावर पठाडे म्हणाले, आधी सोसायट्या नंतर बाजार समिती निवडणुकीसाठी आमचा आग्रह आहे.

बातम्या आणखी आहेत...