आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचापानेर येथील चार शेतकऱ्यांचा ९९ क्विंटल कापूस घेऊन आयशर टेम्पो (एमएच २० ईजी ०७५३) गुजरातमध्ये जात हाेता. दरम्यान, चाेरट्यांनी टेम्पो अडवून चाकूचा धाक दाखवत चालकाचे हातपाय बांधून ३५ क्विंटल कापूस लुटून नेला. ही घटना नंदुरबार जिल्ह्यात तळोदा-अक्कलकुवा रोडपासून दहा किमी अंतरावर कराेडी राेड येथे गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास घडली.
जांभाळा येथील वसीम शेख यांच्या मालकीच्या आयशर टेम्पाेवर चालक असलेल्या मेहबूब शेख यांनी सांगितलेल्या आपबितीवरून, गुरुवारी चापानेर येथील सुनील अशोक हिरे, सागर राजेंद्र हिरे, उमेश निवृत्ती हिरे, दिनेश निवृत्ती हिरे या चार शेतकऱ्यांचा ९९ क्विंटल कापूस बुधवारी सांयकाळी आयशर टेम्पाेमध्ये भरून गुजरातला घेऊन चाललो होतो. नंदुरबारच्या पुढे तळोदा-अक्कुहा रोडवर अचानक पाठीमागून दोन मोटारसायकलवर चार जण हातातील कॅन दाखवत गाडी थांबवा, आम्हाला डिझेल पाहिजे असे सांगत होते. एक-दीड किलोमीटर मागे एक उसाचे ट्रॅक्टर उभे होते. त्यामुळे ते शेतकरी असावेत आणि त्यांच्या ट्रॅक्टरमधील डिझेल संपलेले असावे म्हणून गाडीचा वेग कमी करताच मोटारसायकलवरील दोन जण गाडीत चढले, त्यांनी चाकू दाखवत स्टिअरिंगवरून मला बाजूला केले आणि त्यातील एक जण गाडी चालवायला बसला. तळोदा-अक्कलकुवा या हायवेवरून तब्बल दहा ते बारा किलोमीटर करोडो रोडवर गाडी नेऊन थांबवली. मला व माझ्यासाेबत असलेल्या अन्य एका जणास रोहित्राच्या खांबाला बांधले. एक जण चाकू आमच्या गळ्याला लावून उभा होता. आम्हाला बांधले आणि काही मिनिटांतच दहा ते बारा जण करोडी रोडवर ११०९ हा आयशर घेऊन तेथे आले आणि गाडीमधील कापूस क्रासिंग करू लागले. दरम्यान, तेथून एक शेतकरी शेतात पाणी भरण्यासाठी जात असताना त्याच्या लक्षात येताच चाेरट्यांनी शेतकऱ्याला धमकावले. त्यामुळे तो शेतकरी तेथून घाबरून पळला. परंतु, तो गावात जाऊन याची माहिती देत आरडाओरडा करेल म्हणून चाेरट्यांनी आयशरच्या डिझेल टाकीचा नट तोडला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.