आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदूरची पालखी शहरात:गुलाबराव महाराजांच्या पालखीचे 350 भाविकांनी घेतले दर्शन

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीच्या चांदूरबाजार येथील गुलाबराव महाराज यांची पालखी नुकतीच औरंगाबादेत आली होती. २२ वर्षांपासून पालखी एन-४ येथील गोपाळ दरख यांच्या निवासस्थानी येते. औरंगाबादमार्गे आळंदीला पोहोचते. एकादशीला चार दिवस मुक्कामी जाते. पालखीमध्ये २० किलोंचा चांदीचा मुखवटा आहे. ३५० भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. वयाच्या नवव्या महिन्यात दृष्टी गमावलेले गुलाबराव महाराज यांचा जन्म ६ जुलै १८८१ मध्ये झाला, तर मृत्यू २० सप्टेंबर १९१५ मध्ये झाला. ३४ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी १३२ ग्रंथांचे लिखाण केले. ज्ञानेश्वरांवर त्यांची गाढ श्रद्धा होती. आळंदीची पालखी २५ वर्षांपासून काढली जाते. औरंगाबादेत एक दिवसाचा मुक्काम असतो. चांदूर बाजार ते आळंदी १५ दिवसांची पालखी यात्रा वाहनातून केली जाते. यामध्ये १५० अनुयायी सहभागी असतात. स्वागत समारंभात माहेश्वरी, मारवाडी, जैन, गुजराती, ब्राह्मण अशा विविध समाजातील लोक सहभागी होतात. दरख यांच्या निवासस्थानी भक्तांची व्यवस्था करण्यात आली होती. सुधीर कोर्टीकर यांनी फुलांची सजावटीची रांगोळी काढली.

बातम्या आणखी आहेत...