आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतमोजणीचे प्रशिक्षण:350 कर्मचाऱ्यांना दिले मतमोजणीचे प्रशिक्षण,मराठवाड्यातील 8 जिल्हाधिकारी 8 सीईओंची हजेरी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणी २ फेबुवारीला चिकलठाणा येथील कलाग्रामसमोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा. लि. येथे होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुनील केंद्रेकर आणि निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने यांच्या उपस्थितीत ३५० कर्मचाऱ्यांचे मतमोजणी प्रशिक्षण झाले. सकाळी आठपासून मतमोजणी सुरू होईल. सातशे कर्मचारी नियुक्त केल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश मणियार यांनी दिली.

सुरुवातीला मतपेटीतील मतांची मोजणी होईल. त्यानंतर २५ मतपत्रिकेचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिकांची सरमिसळ करण्यात येईल. यातून २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे ४० गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर देण्यात येतील. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येईल. एकूण वैध मताप्रमाणे कोटा निश्चित करण्यात येणार आहे. पहिल्या पसंतीमध्ये उमेदवार निवडून आल्यास साधारण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. मात्र दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागल्यास त्यासाठी आणखी उशीर लागणार आहे. या प्रशिक्षणाच्या वेळी औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे, औरंगाबादचे निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम यांच्यासह सर्व उपायुक्त उपस्थित होते. या प्रशिक्षणाच्या वेळी सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...