आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:सेनगाव तालुक्यात चार ठिकाणी छाप्यात ३.५० लाखाचा ऐवज जप्त, सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

हिंगोली9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध चार ठिकाणी दारु अड्डे व जुगार अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यात ३.५० लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये रोख रक्कम, दुचाकी वाहनांचा समावेश असून या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशीरा गुुन्हा दाखल झाला आहे.

सेनगाव तालुक्यात संचारबंदीचा गैरफायदा घेत काही ठिकाणी बेकायदेशी दारुअड्डे सुरु असून शेतातील आखाड्यावर जुगार खेळला जात होता. या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक जगदिश भंडारवार, उपनिरीक्षक किशोर पोटे, शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक नंदे, महिला पोलिस उपनिरीक्षक कांबळे, जमादार विलास सोनवणे, शंकर जाधव, संभाजी लकुळे, राजू ठाकुर, किशाेर कातकडे, ज्ञानेश्‍वर सावळे, विठ्ठल काळे, आकाश टापरे, आशिष उंबरकर, सुनील अंभोरे यांच्या पथकाने चार ठिकाणी छापे टाकले.

यामध्ये लिंबाळा तांडा व ब्रम्हवाडी या ठिकाणी दारु अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात २० हजाराची गावठी दारु जप्त केली आहे. तसेच ब्रम्हवाडी येथील एका शेतात जुगार अड्ड्यावर छापा टाकून ४८ हजार रुपये जप्त केले आहेत. तर सेनगाव शहरालगत एका शेतातील आखाड्यावर जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम व दुचाकी असा २ लाख ८७ हजाराचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात विविध चार गुन्हे दाखल झाले असून यामध्ये १२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...