आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्ह्यात ४ लाख ४९ हजार नागरिक असून त्यापैकी ३ लाख ५९ हजार कुटुंबाचे ‘उमेद’अंतर्गत बचत गट तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी १ लाख ३२ हजार नागरिकांची नोंदणी प्रक्रिया झाली असून केवळ ३६ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिली.
स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेचे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात रूपांतर केलेले आहे. राज्यात ग्रामीण जीवनोन्नोती अभियान (उमेद) हे अभियान राबवत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची दिशा मिळाली आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांना समृद्ध, आत्मसन्मान आणि सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी उमेदअंतर्गत एकात्मिक प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे स्वयंसहायता गट, बचत गट याद्वारे महिलांचे संघटन करून उद्योजकतेला चालना दिली जाते. त्यानुसार जिल्ह्यात तालुका व गावनिहाय बचत गट उभारणीचे उद्दिष्ट दिले आहे.
यातील ४ लाख ४९ हजार नागरिकांपैकी ३ लाख ५९ हजार कुटुंबाची उमेदअंतर्गत बचत गट तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. यात आतापर्यंत १ लाख ३२ हजार नागरिकांची नोंदणी झाली आहे.
तालुक्याच्या ठिकाणी बचत गटांना निधी औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी कम्युनिटी सेंटर, पंचायत समितीच्या कार्यालयात बचत गट डेमो हाऊस तयार केले आहे. या ठिकाणी महिलांनी तयार केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सोयगाव, नाचनवेल व वैजापूर या ठिकाणी बचत गटाचे प्रदर्शन भरण्यासंदर्भात जागा उपलब्ध असून अर्धे काम झाले आहे. तसेच जिल्ह्यातील अन्य तीन ठिकाणी जागेसाठी निधी देण्यात येणार आहे, तर जिल्हा परिषदच्या परिसरात एक जिल्हास्तरीय बचत गट प्रदर्शन हाऊस तयार करण्यात येणार आहे, असेही गटणे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.