आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक एप्रिलपासून प्रारंभ:४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी ३७ केंद्रे; दहा रुग्णवाहिकांद्वारे तुमच्या दारापर्यंत येऊन देणार डोस

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पॅन, आधार किंवा मतदान यापैकी एक तरी ओळखपत्र असणे गरजेचे
  • शहरात रोज दोन ते पाच टक्के रुग्णांना भासते गरज, त्यामुळे सध्या जेमतेम भागेल अशीच स्थित

कोरोनाच्या कहरामुळे शहरातील संपूर्ण व्हेंटिलेटर्स रुग्णांना लागले आहेत. ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णाला व्हेंटिलेटर मिळवण्यासाठी तब्बल दोन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या खासगी आणि शासकीय रुग्णालयांत सुमारे १३ हजार रुग्ण उपचार घेत असून, अवघे २३८ व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार दोन ते पाच टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज असते. म्हणजे किमान रुग्णांना पुरतील एवढेच व्हेंटिलेटर आहेत. पाच टक्के रुग्णांसाठी ते पुरेसे नाहीत. विशेष म्हणजे कोरोना येऊन वर्ष झाले तरी पुरेसे व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाहीत.

आठ दिवसांपासून अति गंभीर रुग्णांच्या नातेवाइकांना व्हेंटिलेटरसाठी धावपळ करावी लागत आहे. ऑक्सिजनच्या आशेने एखाद्या रुग्णालयात गेल्यावर दुसऱ्या रुग्णालयाकडे बोट दाखवले जाते. शिवाय ज्यांना श्वास घ्यायला त्रास आहे, अशांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने शहरातील व्हेंटिलेटर्सची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विदारक चित्र समोर आले.

नवीन व्हेंटिलेटरची किंमत ३ ते १२ लाख : शहरात १५ ते २० व्हेंटिलेटर्स कंपन्यांचे डीलर आहेत. एका व्हेंटिलेटरची किंमत ३ ते १२ लाख आहे. सरासरी ५ ते ८ लाख किमतीचे व्हेंटिलेटर्स सर्वाधिक वापरली जातात. एक व्हेंटिलेटर एकावेळी एकासाठी वापरता येताे. त्यामुळे १० व्हेंटिलेटर्स वाढवायचे म्हटले तरी ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो. सध्या कोरोनामुळे व्हेंटिलेटर्स मागवले आणि भविष्यात रुग्ण कमी झाल्यावर त्यांचा उपयोग झाला नाही तर व्यावसायिकदृष्ट्या ते परवडणारे नाही. त्यामुळे खासगी रुग्णालये नव्याने व्हेंटिलेटर्स मागवताना हा व्यावहारिक विचार देखील करतात, असे एका रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

सरकारी १९, खासगी १८ लसीकरणाचे केंद्रे
लसीकरणासाठी शहरात ३७ केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. यात मनपाची १९ केंद्रे आहेत. त्यात मोफत लस देण्यात येणार आहे. तसेच खासगी १८ केंद्रे असून तेथे २५० रुपयांत लसीकरण करण्यात येत आहे.

२ ते ५ टक्के रुग्णांनाच भासते व्हेंटिलेटरची गरज
कोरोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांपैकी २ ते ५ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज भासते. वेळेत व्हेंटिलेटर मिळाले नाही तर रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो. आमच्याकडे २० व्हेंटिलेटर आहेत. सध्या ते पूर्ण रुग्णांना लावलेले असून नवीन रुग्णांना व्हेंटिलेटरसाठी २४ ते ३६ तास प्रतीक्षा करावी लागते. - डॉ. आनंद देशमुख (एमडी मेडिसिन)

मनपाने मागवले दहा व्हेंटिलेटर्स
मनपाचे आरोग्य अधिकारी डाॅ. बाळकृष्ण राठोडकर यांनी सांगितले, ‘शहरातील व्हेंटिलेटर्सचा तुटवडा लक्षात घेऊन मनपाने शासनाकडे अजून १० व्हेंटिलेटर्सची मागणी केली आहे. ते कधी मिळतील सांगता येत नाही. तोपर्यंत आहे त्या व्हेंटिलेटर्सचाच योग्य वापर करणे सुरू अाहे. म्हणजे सर्वाधिक गरज कुणाला, यानुसार प्राधान्याने व्हेंटिलेरचा वापर केला जाईल.’
मागणीपेक्षा अधिक उत्पादन

मनपाची पूर्ण तयारी
या लसीकरणासाठी मनपाकडून पूर्ण नियोजन केले जात आहे. त्यासाठी आवश्यक सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार नागरिकांना केवळ ओळखपत्र लागणार आहे. तसेच लसीकरण आपल्या दारी ही मोहीमही राबवली जाणार आहे. - डॉ. बाळू राठोडकर, प्रभारी आरोग्य अधिकारी.

ही आहेत खासगी केंद्रे
धूत हॉस्पिटल, एमजीएम, युनायटेड सिग्मा, डॉ. हेडगेवार, कमलनयन बजाज, एमआयटी हॉस्पिटल, मेडिकोव्हर, अल्पाइन हॉस्पिटल, दहिफळे हॉस्पिटल, जे. जे. हॉस्पिटल, लायन्स आय हॉस्पिटल, निमाई, लाइफलाइन, उत्कर्ष, माणिक, सेंच्युरी, कृपामनी, इंटरनॅशनल हॉस्पिटल.

ही आहेत मनपाची केंद्रे
एन-११, एन-८ मनपा आरोग्य केंद्र, सिडको मेडिकोव्हर हॉस्पिटल, चिकलठाणा ईएसआयसी, घाटी, जिल्हा रुग्णालय, सादातनगर, छावणी, बन्सीलालनगर, राजनगर, शिवाजीनगर, बायजीपुरा, आरेफ कॉलनी, सिल्कमिल कॉलनी, शहाबाजार, कैसर कॉलनी, विजयनगर अारोग्य केंद्र, सातारा एमआयटी कॉलेज.

१३ हजार रुग्णांसाठी फक्त २३८ व्हेंटिलेटर्स
औरंगाबाद-एक एप्रिलपासून शहरातील ४५ वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व नागरिकांना कोरोनासंदर्भातील लस दिली जाणार आहे. त्यासाठी मतदान कार्ड, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यांपैकी केवळ एक पुरावा लागणार आहे. शहरातील ३७ केंद्रांवर लस घेण्याची सुविधा असणार आहे. जवळच्या केंद्रावर जाऊन नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन मनपाचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. बाळू राठोडकर यांनी केले आहे. आतापर्यंत तीन टप्प्यांत आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइनवर काम करणारे अधिकारी-कर्मचारी आणि तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात आली. आता ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना लस दिली जाणार आहे. अर्थात याअंतर्गत किती लोकांना लस द्यायची याचा आकडा निश्चित झालेला नाही. ३० तारखेला याबाबत आकडा ठरवण्यात येणार आहे. त्याची पूर्ण तयारी आतापासून करण्यात येणार आहे.

कोरोना येण्यापूर्वी वर्षभरात सरासरी १० व्हेंटिलेटर्स विक्री करायचो. मात्र, मागील वर्षभरात ३५ व्हेंटिलेटर्स विक्री झाले. व्हेंटिलेटर्सची मागणी सुरू असून त्यांना पुरवठाही केला जातोय. कंपन्यांकडे व्हेंटिलेटर्स मुबलक आहेत, शिवाय उत्पादनही मागणीपेक्षा अधिक सुरू आहे.- संदीप वाघ, व्हेंटिलेटर्स डिस्ट्रिब्युटर

लसीकरण आपल्या दारी
जास्तीत जास्त लसीकरणासाठी शहरातील विविध भागांतील ३७ सेंटर्सच्या व्यतिरिक्त मोहल्ल्यात जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन मनपाच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. ‘लसीकरण आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत दहा अॅम्ब्युलन्सद्वारे लसीकरण करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असणार आहे. प्रत्येक वॉर्डात जाऊन हे लसीकरण केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...