आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मराठवाड्यात सोमवारपर्यंत कोरोनाची बाधा झालेले ३८ रुग्ण असून त्यातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच २४ रुग्ण हे एकट्या औरंगाबादेत आहेत. तसेच, औरंगाबादमध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल लातूरचा क्रमांक लागतो, असे विभागीय प्रशासनाने पंतप्रधान कार्यालयाला दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.
परभणी आणि नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तर बीड आणि हिंगोली येथील प्रत्येकी एकाला या आजाराची बाधा झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. विभागात २४८२ जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. त्यातील २१२७ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. २८२ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. गत आठवड्यात औरंगाबादेतील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून गेल्या चार दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते. त्यात आणखी ४ जणांची भर पडली.
जिल्हानिहाय संख्या
औरंगाबादेत चार नवीन रुग्ण
औरंगाबाद : मागील दोन दिवस औरंगाबादेत एकही कोराेना रुग्ण सापडला नव्हता. सोमवारी त्यात ४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यात २ महिला, एक बालिका व एका ज्येष्ठ नागरिकाचा समावेश अाहे. नव्याने आढळलेले रुग्ण हे कोरोनाबाधित कुटुंबाशी संबंधित, त्यांचे नातेवाईक आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.