आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात वाढलेले हवेचे प्रदूषण कमी करणे व हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्र शासनाने १५ व्या वित्त आयोगातून निधी जाहीर केला आहे. त्यात औरंगाबादसाठी आतापर्यंत ३२ कोटी रुपये मिळाले होते. त्यात आणखी सात कोटी २० लाख रुपये महापालिकेला प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत ३९ कोटी २० लाख रुपये प्राप्त झाले आहेत. दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधीची तरतूद केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टच्या भाषणात कृती आराखडा तयार करण्याची घोषणा केली होती. देशातील १२२ शहरांत कृती कार्यक्रम राबवला जाणार आहे. २०२५ पर्यंत हवेतील प्रदूषण ५० टक्क्यांपर्यंत कमी करणे व हवेतील गुणवत्ता २५ टक्क्यांपर्यंत वाढवली जाणार आहे. उपाययोजना करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून निधी दिला जात आहे. महापालिकेला २०२१ आर्थिक वर्षासाठी ३२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यानंतर केंद्र शासनाने राज्यासाठी ४१.३४ कोटी रुपयांचा दुसऱ्या टप्प्याचा निधी दिला आहे. त्यातून महापालिकेला सात कोटी २० लाख रुपये प्राप्त झाल्याचे मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले. या निधीतून हवेतील धुळीचे कण कमी करण्यासाठी शहराच्या विविध चौकांत कारंजे बसवले जाणार आहेत. मुख्य चौकात, उड्डाणपुलांच्या भिंतीजवळ व्हर्टिकल गार्डन विकसित केले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.