आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:सोहम मोटर्स ते मुकुंदवाडी रस्त्यावरील 39 अतिक्रमणे मनपातर्फे जमीनदोस्त

छत्रपती संभाजीनगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोतील सोहम मोटर्स ते मुकुंदवाडीतील शिवाजी चौक, एपीआय कॉर्नर ते मुकुंदवाडी फिश मार्केट परिसरातील ३९ अतिक्रमणे गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जमीनदोस्त केली. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

एपीआय कॉर्नर, मुकुंदवाडी उड्डाणपुलालगत फुलझाडे विक्रेते, गॅरेज, चिकन शॉप व पुढे हॉटेलसह फिश मार्केटमधील अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने काढली. यानंतर सोहम मोटर्स ते पुढे शिवाजी चौक, मुकुंदवाडी येथे कारवाई केली. एपीआय कॉर्नरच्या प्रोझोन मॉल परिसरात फुटपाथ व रस्त्यावर लावलेले दुकानांचे बोर्ड व फरशीची दुकाने, भारत बाजारमधील गॅरेजसह इतर सर्व अतिक्रमणे काढली. नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी आपापली अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावी, असे आवाहन मनपाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...