आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्ण:नेत्र तपासणी शिबिराचा 397 रुग्णांनी घेतला लाभ ; यासाठी डॉ. गणेश सपकाळ यांनी परिश्रम घेतले

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको वाळूज महानगर-२, साऊथ सिटी येथे यश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज, तिसगाव ग्रामपंचायत, साऊथ सिटी चॅरिटेबल ट्रस्ट व एएसजी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ११ जून रोजी नेत्र तपासणी शिबिर झाले. याचा ३९७ रुग्णांनी घेतल्याची माहिती उपसरपंच नागेश कुठारे यांनी दिली. उद्घाटनप्रसंगी मुळा एज्युकेशन सोसायटीचे डॉ. विनायक देशमुख, प्राचार्य डॉ.सच्चिदानंद अंगडी, विष्णू सोळंके, कचरू चव्हाण, भास्कर आहेर, रामदास लहाबर, सतीश तिखे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.फरीन शेख यांनी तपासणी केली. शिबिरासाठी अशोक नरोटे, डॉ. गजानन वैष्णव, डॉ. वंदना पाटील, डॉ. विनोद उदावंत, डॉ. युवराज गिरबने, दीपाली कुलकर्णी, सुवर्णा काळे, रेश्मा पाटील, रेणुका ढाकणे, प्रा.कौस्तुभ पिशोरकर, दिनेश राठोड, सना शेख, अभय जोशी, डॉ. भास्कर हिवाळे, डॉ. गणेश सपकाळ यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...