आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:ग्रामीण मधील 39 हजार 800 गर्भवती महिला कोरोना प्रतिबंधात्मक लस विना

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

एकीकडे १८ वर्षावरील सर्वांनाच १ मे पासून कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे मात्र सर्वसामान्य, जेष्ठ नागरिक आणि मध्यम वयोगटातील लसीकरणाबाबत मार्गदर्शक सूचना जाहिर करतांना गर्भवती आणि स्तनदा मातांंविषयीचे कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे औरंगाबाद जिल्हयातील ३९ हजार ८०० गर्भवती आणि स्तनदा मातांना मात्र लस देण्यातून वगळण्यात आले आहे . अशी माहिती जि.प. महिला व बालविकास विभागाचे अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले.

पुन्हा एकदा देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. मागील वर्षी शहरी भागात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने लोकांचा ओढा हा ग्रामीण भागात वाढला होता. आता मात्र शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, शहरासह ग्रामीण भागतही मृत्यदर वाढतो आहे. यासाठी खबरदारी म्हणून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. मास्कचा वापर, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीसह सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी यासाठी देखील मोहिम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जेष्ठ नागरिक आणि ४५ वयोगटावरील नारिकांना लस देण्यात येत होती. तर १ मे पासून १८ वर्ष वयोगटातील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. या सर्वांमध्ये मात्र गर्भवती स्त्रीया आणि स्तनदा माता यांचा सध्या तरी लसीकरणात समावेश करण्यात आलेला नाही. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांमध्ये स्पष्ट म्हटले होते की, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना लस देण्यात येवू नये. कारण लसीच्या चाचण्या या स्तनदा माता आणि गर्भवती महिलांवर झालेल्या नाहीत. सध्या औरंगाबाद जिल्हयातील ग्रामीण भागात एकूण ३९ हजार ८०० गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची नोंद असल्याचे मिरकले यांनी सांगितले.

गर्भवती महिलांना साधारणपणे तीन महिन्यानंतर टी.टी.ई इंजेक्शन देतात.परंतु त्या व्यतिरिक्त कोणतीही लस दिली जात नाही. परंतु कोरोना प्रतिबंधात्मक लस याबाबत स्पष्ट सूचना नाहीत. गरोदर महिला आणि स्तनदा माता यांना लस दिल्यानंतर काही अडचणी येवू शकतात का या विषयी संशोधन झालेले नाही. त्यामुळे अद्याप तरी गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना लसीकरणाबाबत सूचना नाहीत.-डॉ. उल्हास गंडाळ प्रभारी जि.प. आरोग्य अधिकारी

अशी आहे ग्रामीण भागातील स्तनदा माता आणि गर्भवती महिलांची आकडेवारी

औरंगाबाद क्र.एक - ३१७०, औरंगाबाद क्र.दोन - ३९६०, सिल्लोड क्र. एक ३५००, सिल्लोड क्र. दोन - २५६४, पैठण क्र २८८२, पैठण क्र. दोन- २७१३, कन्नड क्र एक. २८६४, कन्नड क्र. दोन- २६०९, गंगापूर क्र. एक - २८७६, गंगापूर क्र. दोन- १९९१, वैजापूर - ४३३२, सोयगांव - १७८८३, फुलंब्री - २७६१, खुलताबाद - १७९५ आदी.

बातम्या आणखी आहेत...