आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिर:साई टेकडीच्या मंदिराचा चार कोटींतून जीर्णोद्धार; अयोध्येप्रमाणे गुलाबी दगडातून साकारणार मंदिर

गिरीश काळेकर | औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व जिल्ह्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान व धार्मिक पर्यटनासाठी आकर्षित करणारे स्थान म्हणून देवळाई परिसरातील साईटेकडी मंदिराची ओळख आहे. शहरापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या मंदिरचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून त्यासाठी चार कोटी रुपयांचा आराखडाही तयार करण्यात आला आहे.

साई टेकडी अनेकांना आकर्षित करते. येथील साई मंदिराचा विकास साधण्यासाठी विश्वस्त मंडळाने जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. श्री साई वृंदावन पंचगुरुधाम प्रतिष्ठानअंतर्गत मंदिराच्या नियोजित बांधकामाचा आराखडा तयार केला आहे. २४ जानेवारी रोजी २५ लाख रुपये खर्च करून आरसीसी बांधकामाचा पहिला स्लॅब टाकण्यात आला. जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात झाली. यापुढे वरच्या मजल्यावर ३ हजार स्क्वेअर फुटांच्या सभामंडपाचे बांधकाम, द्वारकामाईचे मंदिर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. संपूर्ण मंदिराचे काम दाक्षिणात्य पद्धतीने नक्षीकाम केले जाणार आहे. अयोध्याच्या मंदिरासाठी जो दगड वापरण्यात आला, तो बन्सीपहाडपूरचा दगड जो की गुलाबी, ब्राऊन रंगाचा आहे, तो या मंदिरासाठी वापरण्यात येणार आहे. मंदिराच्या परिसरातच नक्षीकाम केले जाणार आहे.

भक्तांच्या देणगीतून काम होणार
श्री साई मंदिराचा संपूर्ण कायापालट केला जाणार आहे. साईभक्तांच्या देणगीतून मंदिराचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. भक्तांनी मंदिरासाठी विविध पद्धतीने मदत देणगी स्वरूपात करावी.- बाजीराव हिवाळे, सचिव, साई मंदिर

बातम्या आणखी आहेत...