आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून 4 दिवस पाऊस:यंदाचा पावसाळाही जोरदार राहणार, शेतकऱ्यांसमोर काढणीला आलेली पिके वाचवण्याचे आवाहन

करमाळा6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात सोमवारी १३ मार्च रोजी रात्री रिमझिम, मंगळवारी १४ मार्चला थोडा मोठा पाऊस झाल्यानंतर १५, १६ व १७ मार्च या तारखांना मोठा पाऊस येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके वाचवावीत, असे आवाहन हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केले आहे. बऱ्याच तज्ञांनी यंदा दुष्काळ सांगितला असला तरी आपल्या अंदाजानुसार २०२२ प्रमाणे २०२३ मध्येही जास्त पाऊस असणार आहे, असा दावाही डख यांनी केला.

करमाळा येथे सोमवारी स्व. दिगंबरराव बागल जयंती निमित्ताने मार्गदर्शन शिबिरात डख बोलत होते. कार्यक्रमात पंजाबराव डख यांनी पावसाचा अंदाज कशा पद्धतीने घ्यायचा, कोणत्या काळात कोणते पीक घ्यायचे, शिवाय निसर्गाचा समतोल राखत कशा पद्धतीने शेती करायची व कमी खर्चात अधिक नफा कसा कमवायचा याबाबत मार्गदर्शन केले. ज्यावेळी पाऊस जास्त असेल त्यावेळेस पावसाला उपयुक्त पीक घ्यावे. थंडी जास्त असेल त्यावेळी थंडीत वाढणारी पिके घ्यावीत. निसर्गाशी समतोल राखत शेती केल्यास नक्कीच फायदा होईल, असे डख म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...