आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:खंडित वीजपुरवठ्यामुळे संतप्त नागरिकांचा ४ किमी आक्रोश

वाळूज18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज सबस्टेशनअंतर्गत असणाऱ्या रांजणगाव, जोगेश्वरी, कमळापूर, वाळूज या परिसरात दररोज पहाटे ५ ते ८ या वेळेत वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे संतप्त नागरिकांनी गुरुवारी भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य दीपक बडे यांच्या नेतृत्वाखाली चार किमी पायी आक्रोश मोर्चा काढला. यात १५० महिलांचा सहभाग होता.

वाळूज सबस्टेशनमधील सहायक अभियंता प्रणीत खंडागळे यांना मोर्चेकऱ्यांनी धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. देखभाल व दुरुस्तीची कामे ठरवून दिलेल्या दिवशीच करण्यात यावीत, अतिरिक्त भार असलेले ट्रान्सफॉर्मर बदला, ग्राहकांना मीटर रीडिंगप्रमाणे बिले द्यावीत आदी मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, सोमवारपासून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे तसेच गणेश कॉलनीत १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर उभारण्याचे आश्वासन खंडागळे यांनी दिले.

या मोर्चात पंचायत समिती सदस्य दीपक बडे, भीमराव कीर्तिकर, शारदा सरोदे, सरला वसईकर, नूरजहाँ शेख, वंदना खैरे, मोहन कांबळे, सय्यद जाकीर, प्रियंका पाईकराव, मनीषा गायकवाड, तोडकर, गणेश हिवाळे, उषा हजारे, माया तपासे, उषा हिवाळे, सुनीता गाडेकर, जरिना शेख, निकिता पारधे, सत्यदेवी प्रसाद, रूपाली मोरेग, शेख जमीर, चंदन राजपूत, ऊर्मिलादेवी, शोभाबाई चंद्रे, शेख आदींचा सहभाग होता.रांजणगावातील नागरिकांनी गुरुवारी वाळूज सबस्टेशनवर पायी मोर्चा काढला.

बातम्या आणखी आहेत...