आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध सात पुरस्कार:वाणिज्य परिषदेत उत्कृष्ट शोधनिबंधांसाठी विद्यार्थ्यांना 4 लाखांची बक्षिसे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आजपासून तीन दिवस होत असलेल्या इंडियन कॉमर्स असोसिएशनच्या ७३ व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेत दर्जेदार संशोधन व शोधनिबंधांसाठी विविध ७ पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांची रक्कम तब्बल ४ लाख १२ हजार असणार आहे. २ लाख रुपये पुरस्काराची सर्वाधिक मोठी रक्कम आहे. त्याशिवाय कॉमर्स अँड मॅनेजमेंट टॅलेंट सर्च परीक्षाही घेतली जाणार आहे.

अखिल भारतीय वाणिज्य परिषदेचे उद्घाटन गुरुवारी होईल. त्यानंतर पुढील दोन दिवसांत विविध विषयांवर परिसंवाद होतील. परिषदेत ९१२ संशोधनपर लेख प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ५९२ शोधनिबंधांचे प्रत्यक्ष वाचन केले जाणार आहे. दर्जेदार शोधनिबंध आणि त्याच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी विविध ७ पुरस्कार दिले जाणार आहेत. वाणिज्य आणि व्यवसाय व्यवस्थापनामध्ये दर्जेदार शोधनिबंधासाठी प्रोफेसर एम. एम. शहा मेमोरियल अवॉर्ड दिला जाईल. हा एकच पुरस्कार असून त्याची रक्कम २ लाख रुपये असणार आहे. शिवाय आकर्षक मानचिन्हे दिली जाणार आहेत. विद्यार्थी संशोधकांनी जर अतिशय लोकोपयोगी संशोधन सादर करणारा पेपर सादर केला तर त्यांना सौरभ शिवारे मेमोरियल यंग रिसर्च अवॉर्ड दिला जाणार आहे.

या पुरस्काराची रक्कम २५ हजार रोख आणि मानचिन्ह असणार आहे. प्रोफेसर ए. डी. शिंदे फेलोशिप या नावाने एका विद्यार्थ्याला १२ महिन्यांसाठी ५० हजार रुपयांची फेलोशिप दिली जाणार आहे. प्रोफेसर समुद्दीन मेमोरियल स्कॉलर अवाॅर्ड विभागून देण्यात येणार आहे. ५ संशोधक विद्यार्थ्यांना अनुक्रमे ५ ते १ हजार रुपये रोख रकमेचे पारितोषिक दिले जाईल. त्याशिवाय एमएमएसआर अवाॅर्ड, बीबीएवाय अवाॅर्ड देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाणार आहे.

प्रज्ञाशोध परीक्षेत प्रावीण्य मिळवणाऱ्यांनाही रोख रक्कम ऑल इंडिया कॉमर्स अँड मॅनेजमेंट टॅलेंट सर्च एक्झामिनेशन अर्थात वाणिज्य विषयात प्रज्ञाशोध परीक्षा घेतली गेली आहे. या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्यांनाही आकर्षक पारितोषिके दिले जाणार आहेत. त्यामध्ये प्रथम येणाऱ्यास पन्नास हजार, द्वितीय-४० हजार आणि तृतीय स्थानी असणाऱ्यांना ३० हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. सात जणांना प्रत्येकी २ हजारांचे उत्तेजनार्थ बक्षीस देणार आहे. सहा ठिकाणी हे प्रेझेंटेशन केले जाणार असल्याचे डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...