आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:लाइन ब्लॉकमुळे 4 रेल्वे उशिरा धावल्या, प्रवासी ताटकळले

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू-ढेंगळी-पिंपळगाव-मानवत रोड यादरम्यान लोहमार्गाच्या कामासाठी मंगळवारी (४ एप्रिल) पाच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. यामुळे चार रेल्वेगाड्या उशिराने धावल्या. छत्रपती संभाजीनगर स्थानकावर प्रवाशांची मोठी अडचण झाली. मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस १३५ मिनिटे उशिराने आली. नांदेड-पुणे एक्स्प्रेस ५० मिनिटे उशिराने धावली. काचिगुडा-रोटेगाव एक्स्प्रेस १९० मिनिटे उशिरा आली. नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वे‌ळेपेक्षा ९० मिनिटे उशिरा सोडण्यात आली. रेल्वे प्रशासनाच्या वतीने मेगा ब्लॉकबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आली होती. असे असताना प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक होती. बुधवारी (५ एप्रिल) सुटणारी धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस धर्माबादहून ६० मिनिटे उशिराने सुटणार आहे.