आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:सहकाऱ्यावर चाकूहल्ला करणाऱ्यास 4 वर्षांची शिक्षा

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मस्करी केल्याची तक्रार सुपरवायझरकडे केल्याने रागाच्या भरात रस्त्यावर सहकाऱ्यांचा पाठलाग करून त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आरोपी सचिन लक्ष्मण परदेशी (२२, रा. धनगरवाडी, हर्सूल) याला चार वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्या. एन. एल. मोरे यांनी ठोठावली.

अजय राजेंद्र टाक (३३, रा. बजाजनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आणि आरोपी दोघे लक्ष्मी बॉडी कंपनीत काम करतात. सचिन नेहमी अजयची मस्करी करीत होता. ९ एप्रिल २०२१ रोजीही दोघे कामावर असताना आरोपीने पुन्हा मस्करी केली. त्यामुळे वैतागून त्यांनी सुपरवायझरकडे तक्रार केली.

१० एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता फिर्यादी मित्रांसह कंपनीतून दुचाकीवर घरी निघाले. सव्वाआठ वाजेच्या सुमारास एफडीसी काॅर्नरजवळ सचिन परदेशी फिर्यादीच्या गाडीसमोर आला. त्याने फिर्यादीवर चाकूने वार केला. फिर्यादी जीव वाचवण्यासाठी रस्त्याने पळू लागला. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी सहायक निरीक्षक सी. व्ही. ओगले यांनी दोषारोपपत्र दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...