आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:पर्यटन, धार्मिक स्थळांच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी 40 कोटी मंजूर; शूलिभंजन, वेरूळ येथील विकासकामे होणार

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरातील पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा उभारणीसाठी पर्यटन व सांस्कृतिक विभागाने ४० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिलेली आहे. वित्त विभागाने ४ एप्रिल रोजी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. हा निधी जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्यास पर्यटन व सांस्कृतिक विभागाने मान्यता दिलेली आहे. याअंतर्गत शूलिभंजन आणि वेरूळ येथील पायाभूत सुविधांची महत्त्वाची विकासकामे करण्यात येणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शूलिभंजन (ता. खुलताबाद) हे पर्यटन आणि धार्मिक स्थळ म्हणून परिचित आहे. श्री दत्तात्रेय मंदिर आणि संत एकनाथ महाराजांचे तपश्चर्या स्थळ असल्यामुळे शूलिभंजन येथे भाविकांची नेहमी गर्दी असते. या ठिकाणी भाविकांसाठी यात्रा निवासस्थान बांधणे व सुशोभीकरणासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ९९ लाख रुपये वितरित करण्यात आले अाहेत. विकासकामांमुळे परिसरातील सुविधांमध्ये वाढ होणार आहे. कायगाव टोका (ता. गंगापूर) येथे पुरातन रामेश्वर मंदिर आहे.

या मंदिर परिसरातील पार्किंगमध्ये सुशोभीकरण करण्यासाठी १० लाख रुपये प्रस्तावित निधी मिळणार आहे. वेरूळ येथील लक्ष्मीविनायक मंदिर परिसरात सुशोभीकरण, वेरूळ येथील केशवानंद मठ ते पोस्ट ऑफिस रस्ता, दौल मलिक दर्ग्यापर्यंत रस्ता या कामांसाठी प्रत्येकी १० लाख रुपये निधी प्रस्तावित आहेत. खुलताबाद तालुक्यातील आखातवाडा येथे गोरक्षनाथ मंदिरासमोर सभामंडप उभारणे, लामणगाव येथील लंबेश्वर मंदिर परिसरात सुशोभीकरण, म्हैसमाळ येथे गिरिजामाता मंदिर परिसरात सुशोभीकरणासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये निधी मंजूर आहे. पाडळी (ता. खुलताबाद) येथे सामाजिक सभागृहाच्या बांधकामासाठी ५० लाख रुपये, पालखेड (ता. वैजापूर) येथे पत्र्याचा डोम उभारण्यासाठी ३० लाख रुपये आणि मेहेगाव (ता. कन्नड) येथे श्रीक्षेत्र भगवानबाबा गडावर सामाजिक सभागृह बांधण्यासाठी ४० लाख रुपये प्रस्तावित निधी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

शूिलभंजनसाठी ५ कोटी भाविकांसाठी निवासस्थान बांधणे व सुशोभीकरणासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ९९ लाख रुपये वितरित करण्यात आले अाहेत. विकासकामांमुळे परिसरातील सुविधांमध्ये वाढ होणार आहे.