आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धान्य वाटप झाले बंद:आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांतील 40 लाख शेतकऱ्यांना 5 महिन्यांपासून धान्याची प्रतीक्षा

प्रवीण ब्रह्मपूरकर |औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील आठ, विदर्भातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना धान्य वाटप करण्याचा निर्णय १५ ऑगस्ट २०१५ पासून अमलात आला. २ रुपये किलोने गहू, तीन रुपये किलोने तांदूळ दिले जात होते. कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी पाच किलो धान्य मिळत होते. आॅगस्ट २०२२ पासून गहू, ऑक्टोबरपासून तांदूळ मिळणे बंद झाले. ३९ लाख ९७ हजार १८३ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. यंदा अतिवृष्टीमुळे ही योजना सुरू ठेवावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. १४ पैकी सर्वाधिक ५ लाख ५३ हजार ५२६ लाभार्थी बीड जिल्ह्यात आहेत. त्यांना दरमहा २७६८ मेट्रिक टन धान्य मिळत होते. उर्वरित जिल्ह्यांत लाभार्थी आणि धान्य वाटप असे : औरंगाबाद : ३ लाख ५८ हजार (१७९० मे. टन), जालना : १ लाख ४३ हजार (७१५), नांदेड : ३ लाख ८४ हजार (१९२५), हिंगोली : एक लाख ६९ हजार (८४८), उस्मानाबाद : २ लाख ५० हजार (१२५५) लातूर : २ लाख ९९ हजार (१५००), अमरावती : ५ लाख ३ हजार (२५१५), वाशिम : ९९ हजार (४१९), अकोला १ लाख ९२ हजार (९६३) बुलडाणा : ३ लाख ७२ हजार (१८६०), यवतमाळ : ३ लाख ५८ हजार (१७९५), वर्धा : ५६ हजार (२८४).

१४ जिल्ह्यांत दरमहा होते २० हजार मेट्रिक टन धान्य वाटप गहू १२,६५५ मेट्रिक टन या १४ जिल्ह्यांत दरमहा २० हजार टन धान्य वाटप करण्यात येत होते. यामध्ये गहू १२,६५५, तर ७३११ मेट्रिक टन तांदूळ असे १९,९८६ मेट्रिक टन धान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जात होते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळतील, अशी काळजी घेण्यात आली होती. अर्थात या धान्यपुरवठ्याचा आत्महत्या रोखण्यासाठी किती उपयोग झाला याची नेमकी नोंद नाही. मात्र, १४ जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी जीवन संपवण्याचे सत्र सुरूच आहे.

पुरवठा विभागाने हात झटकले जुलै महिन्यात गव्हाचा पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर गहू आलेला नाही. आॅक्टोबर महिन्यानंतर तांदूळ वाटप बंद झाले. आता ही योजना पुन्हा सुरू होणार की नाही याविषयी माहिती नसल्याचे पुरवठा विभागाचे अधिकारी सांगत आहेत.

बातम्या आणखी आहेत...