आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमान 100 कोटींचा टप्पा गाठण्याची धडपड:एमआयटीकडून 40 लाखांचा थकीत मालमत्ता कर वसूल

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मालमत्ता कर वसुलीचा हा शेवटचा महिना असूनही उद्दिष्टाच्या निम्मी वसुलीदेखील मनपाकडून झालेली नाही. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात किमान १०० कोटींचा टप्पा गाठण्याची धडपड सुरू आहे. त्यानुसार गुरुवारी विशेष पथकाने एमआयटी महाविद्यालयाकडे थकलेला ४० लाखांचा मालमत्ता कर वसूल केला. सहायक आयुक्त संतोष टेंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

विटखेडा येथील निर्माण गोल्ड यांच्याकडील चार लाखांचा कर वसूल केला. झोन क्रमांक ७ मध्ये कर थकवलेली तीन दुकाने सील करण्यात आली. दोन दुकानांकडून ४८ हजारांचा कर वसूल करण्यात आला. एसएफएस हायस्कूलकडून आठ लाखांचा थकीत मालमत्ता कर धनादेशाद्वारे वसूल केला.

व्याजाच्या रकमेत ७५ %सूट द्या मालमत्ता कर न भरल्यास वर्षभरात २४ टक्के व्याज आकारले जाते. मागील तीन वर्षांपासून करात सूट दिली होती. ही सूट दिली नाही म्हणून नागरिकांचा कर भरण्यासाठी प्रतिसाद मिळला नाही. त्यामुळे व्याजाच्या रकमेत ७५ टक्के सूट द्यावी, अशी मागणी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...