आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २.४ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापैकी १३,५३९ कोटी रुपये महाराष्ट्राच्या वाट्याला आलेे. बहुचर्चित मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी १९,५९२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी ही माहिती दिली.
मध्य रेल्वे भुसावळ विभागास १४७० कोटींचा निधी मंजूर झाला. त्यातून आैरंगाबाद-भुसावळ १६० किमी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी १५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच औरंगाबाद-बुलडाणा-खामगाव या १७० किमी मार्गाच्या नवीन सर्वेक्षणासाठी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागासाठी १६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात नगर- बीड- परळी या रेल्वे मार्गासाठी ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या रेल्वेमार्गाचा नगर ते आष्टी हा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पुढील बीड, परळीपर्यंतचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नांदेड-देगलूर-बिदर नवीन रेल्वेमार्गसाठी १०० कोटी, सोलापूर -तुळजापूर- उस्मानाबाद या ८५ किमी मार्गासाठी ११० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
औरंगाबाद स्टेशन सुशोभीकरणासाठी ३८० कोटी
जालना व औरंगाबाद या मराठवाड्यातील दोन स्थानकाचा कायापालट करण्याचे रेल्वे मंत्र्यांनी यापूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार जालन्यासाठी १७० कोटी तर औरंगाबादच्या स्थानकातील ३८० कोटी निधी मंजूर झाला आहे. मराठवाड्यातील दुहेरीकरणासाठी मात्र भरीव तरतूद करण्यात आली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.