आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकांवर कारवाई:40 % वाहनचालक, 100 % प्रवासी सीट बेल्ट न लावता करतात प्रवास

औरंगाबाद / संतोष देशमुख14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरक्षिततेच्या दृष्टीने चारचाकी चालवताना चालक व मागे आसनावर बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे दैनिक दिव्य मराठीच्या प्रतिनिधीने रविवारी दिवसभरात शहरातील प्रमुख भागात जाऊन रस्त्यावरील वाहनांची पाहणी केली असता, ४० % वाहनचालक, तर त्यांच्या शेजारी बसलेले १०० टक्के प्रवासी आणि वाहनात पाठीमागे बसलेल्या आसनावरील १०० पैकी एकाही प्रवाशांनी सीट बेल्ट लावल्याचे दिसले नाही. यात पोलिस, रेल्वे, न्यायालयातील अधिकारी, उद्योजक, व्यावसायिकांसह सर्वसामान्य चालक व प्रवाशांचा समावेश आहे.

टाटाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री मर्सिडीज कारमध्ये मागे बसलेले होते. सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला कार धडकल्याने ते बाहेर फेकून त्यांचा जागीच मृत्यू झाला. एअर बॅग उघडल्या, पण मिस्त्री आसनावरून बाहेर फेकले होते. या अपघाताची चौकशी केली जात आहे. मात्र, औरंगाबाद शहरातील वाहनचालक व प्रवाशांनी रोज होणाऱ्या अपघातापासून धडा घेऊन गांभीर्याने सीट बेल्टचा वापर करतात का? याविषयी शहरातील जालना, नगर, पुणे, बीड बायपास मार्गावरील स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता बहुतांश वाहनचालक व मागे बसलेले प्रवासी सीट बेल्टचा वापर करत नसल्याचे दिसून आले.

अलार्म वाजणार, १ हजार दंडाची तरतूद नवीन वाहनांत चालक व शेजारी बसलेला प्रवासी जोपर्यंत सीट बेल्ट लावणार नाही तोपर्यंत अलार्म वाजत राहील, अशा प्रकारची उपाययोजना केली आहे. तरीदेखील बेल्ट लावण्यास टाळाटाळ केली जाते. मागे सीटवर बसलेल्यांसाठी बेल्ट आहे, पण अलार्म वाजण्याची तरतूद केली नाही. त्यामुळे मागे सीटवरील प्रवासी बेल्टचा वापर करत नसल्याचे दिसून येते. यात मिस्त्री यांचादेखील समावेश आहे. यापासून धडा घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मागील सीटवरील सीट बेल्टचा वापर केला नाहीतर अलार्म वाजेल. तरीही बेल्टचा वापर न करणाऱ्यांवर एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असे धोरण जाहीर केले.

वाहन चालवताना सीट बेल्ट ही लाइफ सेक्युरिटी
वाहनचालकांनी बेल्टचा वापर केला नाहीतर अपघतात एअर बॅगही उघडत नाहीत. प्रत्येक गाडीला समोर दोन व मागे दोन सीट बेल्ट आहेत. गाडीबरोबर शरीरही त्याच वेगाने धावते. जेव्हा दुर्घटना होते तेव्हा गाडीचा स्पीड शून्य होतो व मागील प्रवासी समोरच्या प्रवाशांना घेऊन तेवढ्या स्पीडने बाहेर फेकला जाताे. त्यामुळे सीट बेल्ट ही लाइफ सेक्युरिटी आहे. -विशाल ढुमे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग

बातम्या आणखी आहेत...