आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबदलत्या काळात विकासाची पद्धत स्वीकारल्याने त्याचा परिणाम जीवसृष्टीवर होत आहे. एकीकडे घरांची संख्या वाढलेली असताना दुसरीकडे वृक्षांची संख्या कमी झाली. त्यामुळे शहरात चिमण्यांचे ४० टक्के, कावळे २५ टक्के, तर घारींचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी झाले, अशी माहिती पर्यावरणप्रेमी डॉ. दिलीप यार्दी यांनी दिली.
एन्व्हायर्नमेंट रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशन, ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळ संचलित महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या वतीने शुक्रवारी नववा पक्षी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या वेळी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ विजय दिवाण, डॉ. दिलीप यार्दी, प्राचार्य मीना पाटील, वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, डॉ. उत्तम काळवणे, डॉ. संतोष भोसले यांची उपस्थिती होती.
पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी हे करावे लागणार उपाय पक्ष्यांचा अधिवास वाढवण्यासाठी वृक्ष लावा. माणसांच्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षणामध्ये वेळ घालवावा. निसर्गप्रेमी निर्माण होण्याची गरज आहे. कृत्रिम घरटे वाटप केल्यास चिमणी, गयाळ, भांगपाडी मैना, बुलबुल, पारवा, चिमण्या घर बांधतात.
ही आहेत पक्ष्यांचे प्रमाण कमी होण्याची कारणे यार्दी यांनी सांगितले की, पूर्वी पानदरिबा, शहानूरमियाँ दर्गा, गोगाबाबा टेकडी या ठिकाणी चिमण्या मोठ्या प्रमाणात होत्या. त्या ठिकाणी बांधकामे झाली, वृक्षतोड झाली. चिमण्यांचे निवासस्थान कमी झाले. फ्लॅट सिस्टिममुळे आंगण राहिले नाही. जेवणाचे खरकटे पडत नाहीत. त्यामुळे चिमण्यांना अन्न मिळणे बंद झाले. यामुळे चिमण्या, कावळे, कबुतरासह इतर पक्ष्यांची संख्या कमी झाली. प्रा. विजय दिवाण म्हणाले की, आधुनिक काळात विकास पद्धतीमुळे संख्या कमी झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.