आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा काण्व ब्राह्मण समाज व डॉ. हेडगेवार रुग्णालयातर्फे १२ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर येथील काण्व क्लिनिकमध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये ४० महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमतरता असल्याचे दिसून आले. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आरती पाटील तसेच बालरोगज्ज्ञ डॉ. अमित पिलखाने यांनी आरोग्य तपासणी केली.संस्थेचे अध्यक्ष सीएस लक्ष्मीकांत जयपूरकर, अशोक भाले, दीपक खळेगावकर,धनंजय पांडे, संगीता कागबटे, सविता आचार्य, विजयालक्ष्मी भाले यांची उपस्थिती होती.
वजन कमी-जास्त होत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी
डॉक्टरांनी १७० महिलाची तपासणी केली, त्यात ४० महिला सामान्य आजाराचे आढळून आले. ३५ ते ४० महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता, हाडांचा त्रास, कंबरदुखी, अचानक वजन वाढणे, वजन कमी होण्याच्या तक्रारी होत्या. ८ ते १५ वयोगटातील मुलींमध्ये सकस आहाराची कमतरता आढळून आली. या वेळी डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या वतीने कॅल्शियमच्या, व्हिटॅमिनच्या गोळ्या देण्यात आल्या. १५ महिला रुग्णांना विविध तपासण्या करण्यासाठी सुचवण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.