आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीतर्फे शनिवारी मुंबईत मोर्चा काढण्यात आला. त्यात उद्धवसेनेच्या औरंगाबादेतील ४० टक्के मोठ्या पदाधिकाऱ्यांनी कौटुंबिक कारण देत दांडी मारली. सामान्य कार्यकर्ते मात्र अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने सहभागी झाले होते. बंडामुळे नेत्यांची विभागणी झाली आहे. त्यामुळे आता तरी उमेदवारी मिळेल. या मोर्चातून हुकूमशाहीविरुद्ध लढण्याची दिशा मिळाली, असा त्यांचा दावा आहे.
औरंगाबाद शहरातून किमान पाच हजार जण मोर्चाला जातील, अशी अपेक्षा असताना १५०० जण गेले होते. बहुतांश जणांनी स्वखर्चाने प्रवास केला. जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी म्हणाले की, कोण आले नाही, याचा आढावा घेईन. पण अनेकांनी वैयक्तिक कारणे सांगून माझी परवानगी घेतली होती.’
काँग्रेस, राष्ट्रवादी, सपाचे समर्थकही जास्त आले
मोर्चात सहभागी गोपाळ कुलकर्णी म्हणाले की, हा मोर्चा विरोधकांच्या उरात धडकी भरवणारा होता. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचेही समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हुकूमशाही नव्हे तर शिवशाहीचे समर्थक होते. असा दावा हर्सूल येथील संजय हरणे यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.