आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरींची पाठवणी:महालक्ष्मींसमोर 40 टक्के नवस मुलं अन‌् घर होण्याचे ; खीर-कानोल्याचा नैवेद्य अन‌् हळदी-कुंकू

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माहेरी आलेल्या ज्येष्ठा-कनिष्ठा श्री महालक्ष्मी देवींची तीन दिवसांच्या पाहुणचारानंतर सोमवारी पाठवणी करण्यात आली. यानिमित्ताने घरोघरी खीर- कानोल्याचा नैवेद्य झाला. सायंकाळी सुवानिसींचा हळदी-कुंकवाचाही कार्यक्रम झाला. इच्छित मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून श्री महालक्ष्मींकडे दरवर्षी भाविक आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवतात. गेल्या वेळी बोललेला नवस यंदा पूर्ण करणे, यंदा नवीन साकडे घालणे ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. कोरोनाच्या संकटातून कुटुंबाचा बचाव केल्यामुळे गौरींचे आभार मानताना अनेकांनी नवस केले, यात सुमारे ४० टक्के भक्तांनी आपले स्वप्नातले घर यावर्षी पूर्ण व्हावे किंवा आपल्या घरात पाळणा हलावा, याबाबतचे होतेे.

गुलमंडीवरील मीरा तोतला यांच्या निवासस्थानी दरवर्षी. ५ ते ६ हजार लोक दर्शनाला येतात. त्यांच्या महालक्ष्मींसमोरही अनेक जण नवस बोलतात. ‘दिव्य मराठी’ने काही भाविकांशी चर्चा केली असता ४० टक्के लोकांनी नवीन घर व मुलं होण्यासाठी गौरीला साकडे घातल्याचे समोर आले. इतरांनी आर्थिक समस्या, आरोग्य व इतर विघ्ने दूर होण्यासाठी साकडे घातल्याचे समोर आले.

शिवरायांच्या पराक्रमाचे देखावे
दरवर्षीच्या तुलनेत यंदा देवीसमोर लक्षवेधी देखावे चर्चेत राहिले. क्रांती चौकात छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवल्यावर भव्य उत्सव साजरा झाला, ज्याची जागतिक मीडियाने दखल घेतली होती. त्याची छाप अनेक कुटुंबांतील देखाव्यात दिसून आली. अनेक कुटुंबांनी गौरींसमोर गडकिल्ले आणि शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे देखावे मांडले होते. तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ची थीमही अनेक देखाव्यांत दिसली. काहींनी शहिदांची आठवण जागी केली.

बातम्या आणखी आहेत...